१६ जून ला मतदान तर १८ जूनला मतमोजणी
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
बहुचर्चित सहकार शिरोमणी वसंतराव काळे (चंद्रभागा) सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, 16 जून रोजी मतदान होणार आहे. तर 18 तारखेला मतमोजणी होणार आहे.
पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपून बरेच दिवस झाले आहेत त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे डोळे लागले होते .
असा आहे निवडणूक कार्यक्रम
अखेर या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक 12 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत 18 मे हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल 19 तारखेला अर्जाची छाननी करून 22 मे रोजी ग्राह्य उमेदवारांची यादी प्रकाशित होईल 23 मे पासून सहा जून पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत सात जून रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असून 16 जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे त्यानंतर 18 जूनला मतमोजणी होणार आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा