मारोती भागानगरे यांचा उपोषणचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील मौजे गोदामगाव येथे 2020 ते 2023 पर्यंत सरपंच व ग्रामसेवक यांच्या अधिपत्याखाली एकही ग्रामसभा न लावता पंधराव्या वित्त आयोगाचा विनाकारण खर्च केला जात आहे. त्याची कॅशबुक झेरॉक्स ग्रामसभा लावून ग्रामसभेत घेणे असे एकंदरीत चालत असल्यामुळे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आपण आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे मांजरम सर्कल प्रमुख मारुती बाबाराव पाटील भागानगरे यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे.
वृत्त असे की, मौजे गोधमगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये संपूर्ण महिला सदस्य व सरपंच असल्यामुळे आत्तापर्यंत गावात कोणतेही काम होत नाहीत ,कारण महिलांना स्वतंत्र अधिकार त्या ठिकाणी त्यांच्या पतिराज यांनी दिलेला नाही सर्व कामे कागददा वरच करून ग्रामसेवक व सरपंच यांचा मनमानी कारभार सदर गावामध्ये एकंदरीत चालू आहे मौजे गोदमगाव येथे 2020 ते 2023 पर्यंत एकही ग्रामसभा लावून ग्रामसभेमध्ये किती आराखडे तयार झाले व किती कामे कॅशबुक झेरॉक्स सोबत आणून ग्रामसभेमध्ये पूर्ण रेकॉर्ड सहित पूर्ण ग्रामपंचायत व स्वतः निवेदन कर्त्यांना पूर्ण पंधराव्या वित्त आयोगाचा खर्च संपूर्ण कॅशबॅक सहित रेकॉर्ड ची माहिती देण्यात आलेली नाही.
म्हणून सदर गावामध्ये मनमानी कारभार ग्रामसेवक व सरपंच यांच्या मुळे चालत असून याबाबत संपूर्ण ग्रामस्थांनी विविध माहिती विषयी योजना न मिळाल्यामुळे तक्रार देण्याच्या भूमिकेत दिसत असताना आपण याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करणे गरजेचे आहे अन्यथा चौकशी न झाल्यास व कारवाई न झाल्यास दिनांक 15 मे 2023 पर्यंत आपण चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयापुढे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे मांजरम सर्कल प्रमुख गोदमगाव नगरीचे भूमिपुत्र मारुती बाबुराव पाटील भागानगरे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे असा तक्रार दिलेली आहे.
---------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा