तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली व तलाठी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा नांदेड, (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
तालुक्यातील मौजे कुष्णूर एमआयडीसी या बहुचर्चित असलेल्या गावांमध्ये आज शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत शेतकरी मेळावा तहसीलदार गजानन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, व तलाठी करवंदे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली नुकताच संपन्न झालेला आहे.
शासन आपल्या दारी हा उपक्रम शासनाने सर्वत्र रबवित असताना या माध्यमातून शासनाच्या विविध योजना विषयी सविस्तर माहिती शासनाच्या वतीने विविध गावात पूर्वीला जाते परंतु एवढे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी महत्त्वपूर्ण विषय असताना या उपक्रमांतर्गत काही अधिकाऱ्यांनी दांडी मारावी हे गैर ठरणार आहे अशी समस्त गावकरी नागरिकांतून बोलल्या जात आहे. परंतु या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तर या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी नंदकुमार काकडे, अवलकारकून एस वाय मांजरमकर, संजय गांधी योजनेचे विभाग प्रमुख रेड्डी ,मंडळ अधिकारी कळकेकर, अव्वल कारकून लक्ष्मण टेकाळे ,कर्तव्यदक्ष तलाठी अधिकारी श्रीमती करवंदे मॅडम, यासह मोखेडे, परोडवाड, डावरगावे, लांडगे या तलाठी अधिकाऱ्यांसह सर्व कोतवाल कर्मचारी यांची आवर्जून उपस्थिती होती.
यावेळी शासनाच्या वतीने शासन प्रतिनिधी म्हणून असलेले अधिकारी यांनी शासनाच्या विविध योजना विषयी माहिती ग्रामस्थांना दिली आहे त्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी विविध योजनांचा सविस्तर असा माहिती त्यांनी घेतलेली असून यावेळी या शासन आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत शेतकरी मेळाव्यात केंद्रीय मुख्याध्यापक कृष्णुर येतील हौसाजी वारघडे सदर गावचे नागरिक माधवराव शामराव पाटील कदम ,ऐसाजी देवराव पाटील कदम यांची व समस्त गावकरी नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाच्या कोणत्याही माहिती विषयी किंवा योजनेविषयी आपण लाभ घेताना त्याचे प्रथम ऑनलाइन करणे गरजेचे आहे असे श्रीमती तलाठी करवंदे मॅडम सांगत पुढे म्हणाले की, या शेतकरी मेळाव्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदविला त्यांचे शासनाच्या वतीने आभार त्यांनी यावेळी आवर्जून मानले आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा