पत्रकार अंदोलनास राजकिय पक्ष, संघटना सामाजिक कार्यकर्ते यांचा जाहीर पाठिंबा.
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पाहिले जाते. मात्र माध्यमांच्या प्रश्न सोडवण्यासाठी उद्दिष्ट व उपाययोजना केल्या जात नाहीत. म्हणून व्हाॅईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून दिनांक 11 मे २०२२ रोजी सकाळी ठीक अकरा वाजता तहसील कार्यालय नायगाव येथे व्हाॅईस ऑफ मीडिया शाखा नायगावची वतीने धरण आंदोलन करण्यात आले.
पत्रकारांच्या विविध मागण्या (१) पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा (२) पत्रकारीतेत पांच वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्विकृती पत्रीका देण्यात यावी. (३) वृत्तपत्रांना जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा (४) पत्रकारांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा .(५) कोरोनात जिव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देवून मयत पत्रकारांच्या कुटुंबाचे पुनवर्सन करावे (६) शासनाच्या सध्याचे जाहिरात धोरण वर क वर्ग दैनिक ( लघु दैनिक ) आहे लघु दैनिकांनाही ( ब वर्ग ) दैनिकांप्रमाणे जाहिराती द्याव्यात. आदी मागण्यांबाबत धरणे आंदोलन तालुकाध्यक्ष नागेश कल्याण, ज्येष्ठ पत्रकार वाहबोद्दिन शेख, माधव मामा कोकुर्ले याच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील व्हाॅईस ऑफ मिडियातील, सरचिटणीस माधवराव बैलकवाड,पत्रकार गंगाधर ढवळे, संदिप कांबळे, बी. आय. बडूरे सर, चंद्रकांत सर्यतळ, देविदास जेठेवाड, संभाजी वाघमारे, अनिल ढवळे, डि.एच.मुदखेडे, नागोराव पाटील बंडे, उमाकांत बडूरे, शिवाजी कुंटूरकर, पवनकुमार पुठ्ठेवाड, गंगाधर कोतेवार, यांसह तालुक्यातील इतर पत्रकार बांधवांची मोठी उपस्थिती होती. अंदोलनकर्त्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार गजानन शिंदे यांना देऊन विविध मागण्यांबाबत अंदोलन स्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आले,
पत्रकार अंदोलनास राजकिय पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांचा जाहीर पाठिंबा..भारतीय जनता पक्षाचे नेते, शिवराज पाटील होटाळकर, बालाजीराव बच्चेवार, हिंद युवा परिषदेचे रंजीत देशमुख, भारतीय मराठा महासंघाचे चंद्रकांत पवार, चंद्रकांत चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे गंगाधर बडूरे, शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवाजी कुंटूरकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवाजी पाटील जाधव, दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र चे जिल्ह्य संपर्क प्रमुख नागोराव पाटील बंडे,माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे दत्ता अनंद बन, सामाजिक कार्यकर्ते गणपत रेड्डी, रुई नगरीचे सरपंच देशमुख यांच्यासह आनेकांनी अंदोलना स्थळी भेट देऊन अंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा