प्रहार संघटनेचे भाकरे यांची कैफियत
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये शासनाचा भरमसाठ निधी उपलब्ध होत असूनही गरोदर महिला, अपंग बांधव आणि विविध रोगाविषयी त्रस्त असलेल्या रुग्णांना अपुऱ्या सुविधा मिळत असल्याची खंत प्रहार संघटनेचे जिल्हा सहसचिव रामदास दिगंबर भाकरे यांनी आपली कैफियत मांडली आहे.
नायगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व विविध आजाराविषयी असलेल्या रुग्णांना वेळेवर शासकीय सेवेप्रमाणे सुविधा मिळाला पाहिजे होत्या पण सदर दवाखान्यांमध्ये गरोदर महिलांना तासना तास लाईन मध्ये उभे टाकावे लागते, कर्मचारी वर्ग वेळेवर दवाखान्यामध्ये उपस्थित राहत नाही, तिथे शुद्ध पिण्याचे पाणी देखील दवाखान्यांमध्ये उपलब्ध नाही, आणि यासह संडास स्वच्छतागृह देखील सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे सदर दवाखान्यांमध्ये पेशंट तपासल्यानंतर इलाज न करता त्यांना नांदेडला विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात पाठविल्या जात आहे, ग्रामीण रुग्णालय मध्ये स्थानिक डॉक्टर डॉक्टरीन उपस्थित निवासी राहत नाहीत आणि विशेषतः दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तीला तसे प्रतीक्षा करावी लागते ,दवाखान्यांमध्ये विविध रिपोर्ट टाइमला मिळत नाहीत.
उदाहरणार्थ लघवी तपासणी ,रक्त तपासणी, शुगर तपासणी इसीजी रिपोर्ट मिळत नाही, कुपोषित बालकांना योग्य आहार दवाखान्यात मिळत नाही, दिव्यांग प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही अशा अपुऱ्या सुविधा नायगाव शासकीय रुग्णांमध्ये मिळत आहेत तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून नायगाव तालुक्यातील विविध आजाराविषयी त्रस्त असलेल्या महिलांना, अपंग बांधवांना आणि वृद्ध वर्ग रुग्णांना सर्व सुविधेसह सुविधा मिळाव्यात यासाठी प्रहार संघटनेचे जिल्हा सहसचिव रामदास दिगंबर भाकरे यांनी आपली कैफियत मांडली आहे. तेव्हा वरिष्ठ अधिकारी वेळेच लक्ष घालून सुविधा देणे गरजेचे आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा