पंढरीच्या साठे बंधूंची मुख्यमंत्री शिंदे यांना गिफ्ट
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनीधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक ४च्या पोटनिवडणुकीत साठे बंधू यांच्या मातोश्री नागरबाई देविदास साठे या प्रचंड मतांनी विजयी झाल्या.यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अजूनही गिफ्ट देण्यात आली आहे.
मागील झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभाग क्रमांक ४मधून आणि ५मधून रोहिणी महेश साठे या दोन ठिकाणाहून निवडून आल्या होत्या . त्यामुळे यातील प्रभाग ४मधून राजीनामा दिला होता. यामुळे ही पोट निवडणूक लागली होती. यातील मतमोजणी शुक्रवारी होऊन महेशनाना साठे यांच्या मातोश्री विजयी झाल्या आहेत.
शिंदे गटाचे सोलापूर लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख महेशनाना साठे यांच्या घरातील मोठे बंधू संजय देविदास साठे व त्यांची पत्नी रेश्मा संजय साठे व महेशनाना साठे यांच्या पत्नी रोहिणी महेश साठे यांच्या सह आता मातोश्री नागरबाई साठे या कुटुंबातील चौथा सदस्य निवडून आल्या आहेत.
या निवडणुकीत साठे कुटुंबाला विरोध करण्यासाठी सर्वजण एका बाजूला असल्याचे या निवडणुकीत दिसून आले होते. परंतु मतदारांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकास करण्याची धमक महेशनाना साठे यांच्यात आहे. हे ओळखून या वार्डातील मतदारांनी मोठ्या मतांनी विजयी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा