सहा तासांच्या प्रयत्नानंतर वाहिन्यांची दुरुस्ती, पहाटेपासून वीजपुरवठा सुरळीत
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनधी दिगंबर वाघमारे
पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अतिउच्च दाब 400 KV तळेगाव ते शिक्रापूर चार पैकी दोन वीज वाहिन्यांमध्ये गुरुवारी रात्री साडेसात वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे पुणे पिंपरी आणि चाकण एमआयडीसी वीजपुरवठा खंडित झाला होता या अतिउच्च दाब वीज वाहण्याची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे एक वाजल्यापासून सर्वच ग्राहकांचा वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला.
या कालावधीमध्ये महापारेषण व महावितरण चे सर्व वरिष्ठ अभियंता सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते एकीकडे उन्हाळ्यामुळे वाढलेली विजेची मागणी व तांत्रिक बिघाडामुळे 396 मेगावॅट विजेचे थांबलेले वहन या प्रतिकूल परिस्थितीत भार व्यवस्थापनाद्वारे वीज ग्राहकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू होते. यामध्ये साधारणतः मध्यरात्री एक वाजता टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा पूर्ववत होण्यास प्रारंभ झाला महापारेषण व महावितरणचे उपकेंद्र टप्प्याटप्प्याने सुरू होत गेले त्याप्रमाणे ग्राहकांचा वीजपुरवठा देखील सुरळीत होत गेला. वीज वाहिन्यांमुळे खंडित झालेला सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा