हदगावतील वेश्या व्यवसायाला आवर घाला अन्यथा आमरण उपोषण
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
हदगाव येथील तामसा रोडवर वेश्याव्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला असून त्याचा नाहक त्रास इथल्या नागरिकांना ( वार्ड क्र.१७) होत असल्यामुळे व विशेषता अल्पवयीन मुलं हे वाईट मार्गास जात असल्यामुळे इथले वेश्याव्यवसाय दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे अन्यथा निवेदन करते हे आमरण उपोषण पुकारण्यात येईल असे आशयाचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
हदगाव शहरातील तामसा रोड आता है प्रशस्त झाले असल्याकारणाने अवजड वाहने याच मार्गावरून जातात याचाच फायदा घेत अगोदर एकाच ठिकाणी असलेल्या वेश्याव्यवसाय हे चांगलाच फोफावला असून या ठिकाणी पाच ते सहा ठिकाण आज घडीस पहावयास मिळतात. विशेष म्हणजे शासकीय अनुसूचित जातीचे वस्तीग्रह ,श्री दत्त कला वाणिज्य महाविद्यालय असून जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर दुष्परिणाम होत आहे. निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे की, आमची संपूर्ण वस्ती हे दलित असून या परिसरात आमचा बौद्धविहार असून सुद्धा प्रशासन कसल्याही प्रकारची न्याय करण्याची भूमिकेत दिसत नाही.
वेश्याव्यवसाय करणाऱ्यांची मनोबल इतके वाढले आहे की, बाहेर रस्त्यावर मुली उभे करून नागरिकांना, विद्यार्थ्यांना, अल्पवयीन मुलांना बोलवून हाक मारून आत घरात या असे इशारे करत आहेत. इथल्या नागरिकांनी विचारले की तुम्ही असे का करता ? तर आम्हास याची परवानगी असून तुम्ही आमचे काही करू शकत नाही अशी धमकी वजा इशारा देतात. तरी अशा प्रवृत्तीच्या लोकांवर त्वरित आळा घालावा व हे वेश्याव्यवसाय इतरत्र हलविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली असून इतर ठिकाणी स्थलांतर नाही केल्यास आपण लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा