मारहाण करणाऱ्या आरोपी वर गून्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटुर पोलिस ठाण्या अंतर्गत मौजे कृषणुर येथील तीन जणांनी एसटी बस कृषणुर येथे का थाबंवली नाही म्हणून वाहक व चालक यांना मारहाण करण्यात आली. नांदेड येथून निघालेली बस मुखेड डेपोमध्ये जाणार होते. सदर गाडी कृषणुर बसथानकावर सकाळी 7 वाजता पोहोचली व दोन प्रवासी खाली उतरलो. गाडीमध्ये जास्त प्रमाणात प्रवाशी असल्याने बस उभी केली नाही.
त्यामुळे कृषणुर येथील तीन जण पळत येऊन चालकांना व वाहकांना चपल फेकून मारहाण केली. व शासकीय कामात अडथळा निर्माण केले प्रकरणी चालक काशिनाथ विठ्ठलराव केंद्रे वय वर्षे 40,व कंडक्टर गंगाधर जळबा भद्रे यांनी कृषणुर येथील आरोपी नारायण हौसाजी जाधव, बालाजी यंकोजी जाधव, राहुल परशराम राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना 16/5/2023 रोजी सकाळी 7=45 वाजता कृषणुर बस स्थानक परिसरात घडली आहे.पुढिल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंटुर विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमरे हे करित आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा