मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाचा पित्याच्या मारहाणीत मृत्यू
शिवशाही वृत्तसेवा, प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर कन्नड
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तीस वर्षे तरुणाला मुलीच्या पित्याने बेदम मारहाण केल्यानंतर या तरुणाचा उपचारदरम्यान छत्रपती संभाजी नगर येथे शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.
याप्रकरणी परस्पराविरोधी तक्रारीवरून पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गावातील सतीश सुरेश शिखरे या तरुणाने गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रस्त्यात अडवून विनयभंग करून बलात्काराचा प्रयत्न केला होता यावेळी या मुलीने आरडाओरडा केल्याने तिचे आई वडील धावत आले त्यांनी मुलीची या तरुणाच्या तावडीतून सुटका केली त्यानंतर पिडितेच्या वडिलांनी आरोपी सतीश शिखरे याला फावड्याने बेदम मारहाण केली यात सतीश शिखरे हा गंभीर जखमी झाला त्याला रुग्णवाहिकेतून तातडीने पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी प्रथम उपचार करून छत्रपती संभाजी नगर येथील घाटीत नेण्यास सांगितले.
तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास या तरुणाचा मृत्यू झाला याबाबत पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी सतीश शिखरे यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला आहे सतीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलीच्या वडीला विरुद्ध गुरुवारी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आता जखमी तरुणाचं शुक्रवारी मृत्यू झाल्याने मुलीच्या वडीलाविरुद्धच्या गुन्ह्याच्या कलमात वाढ होणार आहे दरम्यान पोलिसांनी मुलीच्या की त्यासाठी करून शुक्रवारी कन्नड येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली...
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा