सावळदबारा येथे साठवण तलावामधे रात्री च्या वेळेस पाण्यासाठी भटकंती करत असताना जंगली ससा विहिरीमधे पडला.
शिवशाही वृत्तसेवा,सोयगाव तालुका प्रतिनिधी
रईस शेख
दिनांक १८ / ५ / २०२३ रोजी सावळदबारा येथे साठवण तलावामधे रात्री च्या वेळेस पाण्यासाठी भटकंती करत असताना जंगली ससा विहिरीमधे पडलेला असल्याचे कळाले असता ही विहीर टिटवी येथील जल जीवन योजने मधुन ही विहीरी सावळदबारा साठवन तलावामधे खोदण्याचे काम सुरु आहे या विहीरीमधे मोठ्या प्रमानात पाणी साठलेले असुन या विहीरी मधे एक मोठा जंगली ससा पडलेला असल्याचे काही शेतक-यांनी पत्रकारांना सांगीतले असे कळताच पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेऊन विहीरीमधे बघीतले तर एक मोठा जंगली प्राणी ससा पाण्यामधे पडलेला आढळुन आला.
या संदर्भामधे अजिंठा वनपरिक्षेत्र अधीकारी यांना काॕल करुन या घटने संदर्भामधे माहिती देण्यासाठी वन परिक्षेत्र अधीकारी निलेश सोनवणे यांना सकाळी दहा वाजुन चार मिनीटांनी काॕल केला असता सोनवणे यांनी काॕल उचलला नाही नंतर वनपाल अविनाश राठोड यांना काॕल करुन संपर्क साधला असता राठोड यांनी असे सांगीतले मी वन रक्षकांना लगेच पाठवतो परंतु अजिंठा वन विभागाचे एक ही कर्मचारी अधीकारी या ठीकाणी फीरकले नाही कारण त्यांच्याकडे जंगली प्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी वेळ नसल्याचा धक्कादायक बेजबाबदार पणा समोर आला आहे नंतर वनरक्षक सुनिल खरडे यांना काॕल करुन या घटनेची माहिती दिली असता खरडे यांनी सांगीतले मी थोड्यावेळात लगेच येतो परंतु खरडे हे ही पोहचु शेकले नाही.
त्या नंतर एक वन मजुर युसुफ पठाण हे घटनास्थळी पोहचले आणि या वन मजुराने एक जाड दोर ( सोल ) चा बंदोबस्त केला दोर एका झाडाला बांधला आणि एक राजस्थान येथील आपल्या पोटाची उपजीविका भागविण्यासाठी मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या अब्दुल हकीम या व्यक्तीने स्वताच्या जिवाची आणि मुलाबाळांची व कुटुंबाची पर्वा न करता विहीरी मधे दोराच्या सहाय्याने उतरुन दिनांक १९ / ५ / २०२३ रोजी सकाळी ससा या प्राण्याचे प्राण वाचविण्यात यश आले या सशाला मार लागलेला होता आणी ते जखमी अवस्थेमधे होते जर लवकरात लवकर पत्रकार यांनी खबरदारी घेतली नसती.
तर ससा या विहीरीमधे मरण पावला असता कारण हा या सशाच्या पोटामधे पाणी गेल्यामुळे पुर्ण थकुन फुगलेल्या अवस्थेमधे होता अब्दुल हकीम आणि वन मजुर युसुफ पठाण तसेच पत्रकार यांनी या सशाचे प्राण वाचविले मात्र अजिंठा वन विभागाचे अधीकारी, कर्मचारी यांना पत्रकारांनी काॕल करुन संपर्क साधला असताना ही यांना घटना स्थळी यायला वेळ मिळाला नाही असा बेजबाबदार पणा या अजिंठा वन विभाग कर्मचारी ,अधीकारी यांचा दिसुन आला आहे या कामचुकार पणा करना-या कर्मचा-यांवरती कारवाई ची मागणी सध्या केली जात आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा