उत्पादन शुल्क विभागाची मुक संमती
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कल अंतर्गत येणाऱ्या राहेर येथे अवैध दुकाने थाटले आहेत.
सदर देशी दारू हे नरसी येथून लोहगाव मार्ग पार्सल केली जात आहे.त्यामुळे राहेर येथे ठिकठिकाणी देशी दारूचे अवैध दुकाने थाटले आहेत . पानटपरी ,किराणा दुकान, सायकल टॅक्सी व हॉटेल यातुन अनाधिकृत व अवैध देशी दारूचे दुकाने थाटले असल्याने नागरिकांना सहज दारू उपलब्ध होत असून या दारूच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
21 वर्षे असो या आठरा वर्षाच्या अगोदर सर्वच दारूच्या आहारी जाऊन जिवन उध्वस्त करून घेत आहेत. राहेर परिसरात रेती वीट भट्टी माती हे अवैध धंदे सुरू आहे. असून याकडे पैसाही खर्च होतो लाखो रुपयांची उलाढाल केली जाते. त्यामुळे देशी दारूचाही सध्या इकडे दुकाने सुरू आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राहेर परिसरातील ठिकठिकाणी नदीपर्यंत दुकानांमध्ये देशी दारूचे पार्सल केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य परिणाम होऊन लोकांचे संसार हे उध्वस्त होत आहे .याकडे उत्पादन शुल्क अधिकारी बिलोली यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यांची मूक संमती असल्याची ही परिसरातील नागरिकांना बोलल्या जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा