घरांची छपरे, पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर, घर सामानाची नासधूस
शिवशाही वृत्तसेवा, अकोला (जिल्हा प्रतिनिधी संजय क्षीरसागर)
राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुडगूस घातला असून अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे त्याचबरोबर गारपीट अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे आता नागरी वस्त्यातही मोठे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे.
अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील शहानुर मलकापूर पोपटखेळ या भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ग्रामस्थांच्या घराचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
दिनांक 29 एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास अचानक मोठ्या वादळीवाऱ्यांला सुरुवात झाली पाठोपाठ पावसानेही हजेरी लावली या वादळी वाऱ्यात परिसरात झाडे उमळून पडले आहेत , लाईटचे पूल कोसळले आहेत.तसेच घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक रात्री पाऊस आल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत
शहानूर गावातील शांतीलाल धांडे सुभाष कासदे दशरथ बेलसरे मलकापूर येथील लाळके दारसीबे छाया कासदेकर या नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने अपरात्री रस्त्यावर येण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, घराचे छतच उडून गेल्याने सर्व घरात पावसाचे पाणी शिरले त्यात घरातील खाद्यपदार्थ व संसार उपयोगी साहित्यही पावसामुळे खराब झाल्याने या कुटुंबावर उपासमारीची देखील वेळ आली आहे
सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी
या नैसर्गिक संकटात ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान तलाठी राजेश बोकाडे शैलेश धांडे, सुकळी गावचे सरपंच राजू धुंदे अमोल चामलाटे गजानन गावंडे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग तायडे ग्रामपंचायत सदस्य राहुल बार्शी ते सोनिया मावसकर सुधीर भिल संजय गावंडे वायरमन नितीन गोम या सर्वांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती पाहिली तसेच पंचायत समिती पंचनामे देखील केले नुकसानग्रस्तांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा