लोकन्यायालयात रखडलेले खटले निकाली
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
हदगाव येथे दि.३०/०४/२०२३ रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते या लोक अदालत मध्ये वसुली रक्कम एकूण ५०६५५०/ व ८० प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली आहे.
माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३० रोजी राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन हदगाव न्यायालयात करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री जे डी जाधव साहेब दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर हदगाव यांनी केले.तसेच या उद्घाटनाप्रसंगी सहदिवाणी न्यायाधीश श्री आर. डी. माने साहेब, ज्येष्ठविधीतज्ञ, पॅनल विधीतज्ञ, बँकेचे अधिकारी सर्व पक्षकार न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. सदरील राष्ट्रीय लोकन्यायालयात पॅनल एक वर पॅनल जज म्हणून माननीय श्री. जे.डी. जाधव साहेब व पॅनल सदस्य ऍड श्री. संतोष पाईकराव तर पॅनल दोन वर सहदिवाणी न्यायाधीश आर.डी. माने साहेब यांनी काम पाहिले.
यामध्ये प्रलंबित दिवाणी व फौजदारी 55 प्रकरणी निकाली निघाली तसेच दखल पूर्व प्रकरणे 25 तडजोडीने निकाली काढण्यात आली. एसबीआय बँक शाखा हदगाव तामसा ,महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंचायत समिती ,भारतीय संचार निगम चे दाखल पूर्व प्रकरणात सेटलमेंट रक्कम ५०६५५०/एवढी झाली. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष माननीय श्री जे.डी.जाधव साहेब, सहदिवाणी न्यायाधीश आर. डी. माने साहेब तसेच पॅनल सदस्य श्री संतोष पाईकराव ,सर्व विधीज्ञ न्यायालयीन कर्मचारी बँकेचे कर्मचारी पक्षकार यांनी परिश्रम घेतले व राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यात सहकार्य केले.
सदर न्यायालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणास्तव खटले चालू होते पण या लोक अदालत मध्ये ते निकाली काढल्याने आम्ही समाधान आहोत असे पक्षकारानी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना न्यायाधीशाचे आभार मानतो अशा आपल्या भावना व्यक्त केले आहेत.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा