कु.प्रतीक्षा भगवान भद्रेचे ठरले प्रभावी भाषण
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या थाटामाटात नायगाव शहरातील कुशीनारा समशानभूमी येथे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली तर या कार्यक्रमात कुमारी प्रतीक्षा भगवान भद्रेचे ठरले प्रभावी भाषण.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नायगाव शहरातील कुशीनारा समशान भूमी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आलेल्या वेळी पंचशील ध्वजारोहण विजय पाटील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तर महामानवाच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन सुधाकर पाटील शिंदे, पंकज पाटील चव्हाण, नारायण जाधव, संजय चव्हाण, माणिक चव्हाण, हनुमंत बोईनवाड, श्रीनिवास शिंदे, विठ्ठल बेळगे नगरसेवक, आणि रेखा बनसोडे, महानंदा गायकवाड, यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व प्रमुख पाहुणे यांचा जयंती मंडळाच्या वतीने सत्कार केल्यानंतर मौजे होटाळा येथील कुमारी प्रतीक्षा भगवान भद्रे या चिमुकलीने अतिशय सुंदर पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून आपले भाषण प्रभावी ठरविले आहे.
सदर जयंती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष सचिन सोनकांबळे,यासह भीमराव हनुमंते, राजीव भद्रे, अमोल प्रकाश पोटफोडे, अमोल एकनाथ पवार, अक्षय श्रीधर सूर्यवंशी, साईनाथ किरण नामवाडे ,अनिल हावगीर सोनकांबळे, अविनाश भद्रे, मनोज भद्रे, गौतम विठ्ठल सूर्यवंशी, राजू माधव हनुमंते, अजय श्रीधर सूर्यवंशी, नागेश रमेश हनुमंते, प्रकाशभाऊ हनमंते, सिद्धेश्वर भीमराव गजभारे यांनी परिश्रम घेतले आहे तर यावेळी महिला पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा