मौजे खैरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगावच्या नजीक असलेल्या खैरगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिभेचे पूजन करून पंचशील ध्वजारोहण समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.
बहुजन समाजासाठी आयुष्यभर संघर्ष करून भारत देशाला संविधान देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मौजे खैरगाव नगरीमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जयंती मंडळाची अध्यक्ष संजय किशन भेदे, उपाध्यक्ष गंगाधर विठ्ठल भेदे यासह माधव भाऊराव शिरदे, जबिर शेख, सदानंद नारायण भेदे, विनोद कबीरदास बैलकवाड, विठ्ठल गंगाधर बेदे, भीमराव तुळशीराम शिंदे, बळीराम गंगाधर शिरदे यांनी जयंती यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा