शंभर वर्षाचा जाणता माणूस गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा
शिवशाही वृत्तसेवा नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील आलू वडगाव येथील पांडुरंग हनुमंत पाटील इंगोले यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले आहे दिनांक 13 एप्रिल रोजी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला त्यांचे वय 100 वर्षे होते व ते गावातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती होते दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर आलू वडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पक्षात तीन मुलं एक मुलगी सुना नातवंड पतवंड असा मोठा परिवार आहे गावातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा