राज्य सरकारने गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने गरजूंना आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्याचा निर्णय घेतला
बालाजी देडगाव - नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सेवा सहकारी संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले. राज्य सरकारने गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने गरजूंना आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. घोषणा केल्याप्रमाणे येथील स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा किटचे शनीवार (दि.१५) पासून वाटप सुरू करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांना आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, देडगाव विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन महेश कदम, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, सचिव रामकिसन तांबे, वितरक गोरख देवकाते, रामभाऊ तांबे, सेवा संस्थेचे संचालक योसेफ हिवाळे, किशोर मुंगसे, सेवा संस्थेचे संचालक संजू पाटील मुंगसे, शालूमन हिवाळे, सत्यदान हिवाळे, पिसे फिटर, शिवाजी तांबे, अशोक क्षीरसागर, भैय्या पठाण, बाबुराव एडके, विठ्ठल मुंगसे, दत्तू क्षीरसागर, आशाबी पठाण, नारायण एडके, शरद हिवाळे, नामदेव गवळी, युनूस पठाण, सुभाष देवा तांदळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा