पत्रकार धडेकर विवाह सोहळ्यात गावकऱ्यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यापासून सोळा किलोमीटरवर अंतरावर असलेल्या धनंज येथे पत्रकार माधव धडेकर व सिरसे परिवाराच्या मंगल परिणय नुकताच पार पडला पाहुण्यांसाठी जेवणाच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते.त्या पंगती गावातील मराठा समाजाच्या बांधवांनी पाहुण्यांना जेवण वाढण्याचे काम करून सर्वांसोबत पंगतीत बसून एकत्रित जेवण करून धनंज ग्रामस्थांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे.
एकीकडे देशात व राज्यात राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जाती धर्मात द्वेष पसरवण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवल्या जात आहेत तर दुसरीकडे कुठलाही गाजावाजा न करता नायगाव तालुक्यातील धनंज येथील पत्रकार माधव धडेकर व सम्राट किशनराव सिरसे यांच्या मंगल परिणयात ( विवाह सोहळ्यात ) पंगतिक सर्वांसोबत बसून जेवण करून सर्व पाहुण्यांना जेवण वाढण्याचे पवित्र कार्य केले आहे. यातून धनंज ग्रामस्थांनी सामाजित एकतेचा संदेश दिला आहे.
नायगाव तालुक्यातील धनंज हे गाव तसे धार्मिक कामात नेहमी अग्रेसर असते. विविध विधायक चळवळीत नेहमीच पुढे असण्याची परंपरा लाभली आहे. गावात अखंड हरिनाम सप्ताहची परंपरा गेल्या २५ वर्षांपासून कायम आहे. या सप्ताहात सर्व जाती धर्माचे नागरिक हिरिरीने भाग घेतात. श्री.लोकडेश्वर महाराज कलशारोहन वाढदिवसाच्या सप्ताह ,भंडारा मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. या सप्ताहात दररोज सर्व समाजासाठी जेवणाची पंगत असते. राज्यात निवडणुकीच्या तोंडावर विविध धर्मात राजकीय वातावारण तापावण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, संधीसाधू प्रवृत्तीला कोणीही बळी पडणार नाही, असा संदेश धनंज ग्रामस्थांनी दिला आहे.
सदर विवाह सोहळ्याचे व्यवस्थापन उपसरपंच प्रतिनिधी व्यंकटराव पा.सूर्यवंशी ,शरद पा.हंबर्डे,भगवान पा.सूर्यवंशी , तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव पा.सूर्यवंशी , चेअरमन आत्माराम पा.जाधव ,स्वस्थ धान्य दुकानदार राजेश पा.जाधव ,प्रगतशील शेतकरी माधवराव पा.सूर्यवंशी ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष दतात्र्य पा.सूर्यवंशी ,माजी चेअरमन ज्ञानेश्वर पा.सूर्यवंशी ,माजी चेअरमन तानाजी पा.जाधव ,माजी.ग्रा.पं.सदस्य दादाराव पा.हंबर्डे, ग्रा.पं.सेवक नबीसाब शेख , राजेश पा.सूर्यवंशी ,जेष्ठ नागरिक जयवंतराव पा.सूर्यवंशी ,योगेश पा.सूर्यवंशी , माधव पा. सूर्यवंशी ,चंद्रकांत पा.सूर्यवंशी,बालाजी जयवंतराव पाटील, रहिमांनसाब शेख , आंमरोदिन शेख ,हैदर शेख ,राजेश विठ्ठल सूर्यवंशी ,अहेमद शेख ,हुसेन शेख ,रामप्रसाद पांचाळ आदींसह गावकऱ्यांनी केले आहे.
पत्रकारांची जम्बो उपस्थिती..
पत्रकार माधव धडेकर यांच्या मंगल परिणय निमित्ताने माझ्या मुलीला शुभेच्छा देण्यासाठी बाळासाहेब पांडे,माधव बैलकवाड ,मोहन तुरटवाड, कैलास बोडले ,प्रकाशभाऊ हणमंते, प्रल्हाद भंडारे ,दत्तात्रय संगेवार, एस.एम.मुदखेडकर ,बालाजी माली पाटील,माधव पाटील चव्हाण,वाहबोदिन शेख ,अरीफभाई शेख, नागेश पाटील कल्याण ,पवनकुमार पुठ्ठेवाड , शंकर आडकीने , बालाजी हणमंते ,अनिल कांबळे ,साहेबराव धसाडे , मनोहर तेलंग ,लक्ष्मण बरगे ,शषराव कंधारे ,सुभाष पेरकेवार , गोविंदराव नरसीकर ,प्रशांत वाघमारे ,संभाजी वाघमारे , शिवाजी कुंटूरकर ,अंकुश देगावकर ,रामकृष्ण मोरे, उस्मान शेख ,मोहन लांडगे ,दिलीप वाघमारे ,बालाजी नागठाणे , मधुकर जवळे ,गंगाधर ढवळे ,अनिल ढवळे , आदी पत्रकार बांधवांसह पाहुणे मंडळी व गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. News
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा