आजोबांनी शंभर वर्षांपूर्वी लावलेले फणसाचे झाडास आज लागली मधुर फळे
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव शहरातील दिवगंत स्वतंत्र सैनिक मारोतराव गणपतराव पाटील चव्हाण यांनी आपल्या शेतात शंभर वर्षांपूर्वी लावलेले फणसाचे झाड त्याची आज मधुर फळे चव्हाण कुटुंबातील एकूण जवळपास घरातील शंभर सदस्यांना आज मधुर फळे चाखायला मिळाले अशा भावना त्यांनी आमच्या प्रतिनिधी व्यक्त केले.
शहरातील माजी स्वतंत्र सैनिक मारोतराव गणपतराव पाटील चव्हाण यांचे बंधू भाऊराव गणपतराव पाटील चव्हाण यांनी शंभर वर्षांपूर्वी आपल्या शेतात फणसाची एक झाड लावले आज जवळपास शंभर वर्षे उलटून गेली त्या झाडाला जवळपास 400 फळे लागलेली असून किमान एक फळ पाच किलो सात किलो आठ किलो दहा किलो अशा वजनाची असल्याने सदर या चव्हाण परिवारातील कुटुंबांनी कुटुंबातील शंभर सदस्यांना या फळांचे मधुर रस चाखायला मिळतात.
मारोतराव दिवंगत मारोतराव पाटील चव्हाण यांना तीन मुले तर नातू दहा भाऊराव पाटील चव्हाण यांना चार मुले तर नातू सोळा आणि यासह संभाजी पाटील चव्हाण नागोराव पाटील चव्हाण तुकाराम पाटील चव्हाण यांचीही मुले आणि नातवंड अशी एकूण जवळपास 100 चव्हाण परिवारातील सदस्यांना शंभर वर्षांपूर्वी लावलेल्या फणसाच्या झाडाची मधुर फळे आज खायला मिळतात अशा भावना कुटुंबातील ज्ञानेश्वर पाटील चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहेत.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा