अंदाज पत्रकाला बगल देत मर्जी नुसार काम
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या कुंटूर ते गंगनबीड फाटा सहा किलोमीटर रस्त्यासाठी 50 लाख रुपयांच्या निधी मंजूर झाला असून सदर रक्कम गुत्तेदारमार्फत उचल ही करण्यात आली. यामध्ये अंदाज पत्रका नुसार खडे डाबरिकरण व झाडी झुडपे तोडणे, नाली खोदणे, डांबरीकरण करुन खडे बुजविण्याचे काम करण्यासाठी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र अभियंता व गुतेदार यांच्या मर्जी नुसार पुर्ण चांगलाही रस्ता खोदुन गिटि व मुरुटाकून रस्ता काम सोडुन दिले आहे.
गुत्तेदार राहुल पाटील नकाते बेठक बिलोलीकर यांनी या कामाला सुरुवातही केली चांगला रस्ता खोदून त्या रस्त्यावर गिटी व मरून टाकून सदर गुत्तेदार पसार झाला असून अभियंता सिद्दिकी यांना विचारले असता सदर रोड साठी एका किलोमीटर ला एक कोटी रुपये द्यावा तरच रस्ता चांगला होतो मात्र 50 लाख रुपये दिल्याने नुसते टचप भरण्याची काम आहेत.
जिथे खटा आहे तेच खड्डे भरण्याचे काम आहे. त्यामुळे गुत्तेदाराला परवडले नसल्याने गुत्तेदार काम सोडणार होता. तयारीत होता मात्र आम्ही त्यांना काम करण्यास भाग पाडले व सदर मुरुम गिटि टाकून ठेवले आहे. डांबरीकरण होईल याची काय गॅरंटी नाही मात्र त्यांना परवडत नसल्यामुळे सोडून देत आहे . 50 लाखात फक्त तेवढच काम होते. अशी माहिती अभियंता सिद्धिकी , गुत्तेद्वारे यांनी दिल्याने सदर 50 लाखाचे नुसते गिटी व मुरुम टाकुन गुत्तेदार व अभियंत्याचे पोठ भरण्याचा काम चालू असून नागरिकांना मात्र याचा त्रास त्रास सहन करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग नायगाव अंतर्गत एकही कर्मचारी उपस्थित नसतो माहिती विचारायला गेले असता, कोणी सांगत नही, 50 लाख रुपयाचा निधी ग्रामीण भागात रस्त्यासाठी येथे मात्र गुत्तेदार व अभियंतेच्या खिशे भरण्यासाठी का. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अभियंता व गुतेदार संगणमत करून डांबरीकरण केले नाही. यामुळे या रस्त्यावर येजा करतांना नागरिकांना त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा