शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील मौजे टाकळी बु. येथील ज्येष्ठ महिला अनुसयाबाई नरसिंग रेड्डी यांचे वृध्दपकाळाने दिनांक 16 एप्रिल रोजी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या पक्षात पाच मुले व दोन मुली, सुना, नातू, नाती असा मोठा परिवार आहे.
आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या अपत्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या निसर्गामध्ये विलीन झालेल्या कै.अनुसयाबाई नरसिंग रेड्डी यांच्यावर दिनांक 17 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता टाकळी बु.येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या वेळी या.आ. वसंतराव पा. चव्हाण, माजी सभापती संजय बेळगे, संजय पाटील शेळगावकर, गंगाराम नव्हारे, बाबुराव गायकवाड तांदळीकर, टी एम वाघमारे, आनंदराव पेंटे, माधव कुद्रे, एन डी कवठेकर हातनीकर, निष्ठावंत कार्यकर्ते गणपत रेड्डी, तेजेराव वाघमारे यासह महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तर नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक संजय रेड्डी यांच्या त्या आई होत.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा