सोनार यांनी केले आहेत वर्षभरात शैक्षणिक सामाजिक व साहित्यिक असे 56 समाज उपयोगी उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, विश्वविक्रमवीर कवी रवी वसंत सोनार यांचा 51 व्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार करण्यात आला
राणा प्रताप ग्रुप आणि परिवर्तन ग्रुप यांच्यावतीने करण्यात आलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक, उपविभागीय तथा प्रांत अधिकारी गजानन गुरव, सुप्रभात मंडळाचे अध्यक्ष धनाजी देशमुख, पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे सत्कारमूर्ती रवी वसंत सोनार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सविता रवी सोनार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांचा राणा प्रताप ग्रुप व परिवर्तन ग्रुप यांच्या वतीने स्वागत पर सत्कार करण्यात आला त्यानंतर साहित्य सामाजिक कार्यकर्ते विश्वविक्रम वीर कवी रवी वसंत सोनार यांचा 51 व्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला.
रवी वसंत सोनार हे एक प्रसिद्ध साहित्यिक असून त्यांची तेरा पुस्तके प्रकाशित आहेत तसेच ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विक्रमवीर आहेत साहित्य बरोबरच त्यांचे सामाजिक कार्य ही उल्लेखनीय आहे त्यांनी वयाची पन्नास वर्षे पूर्ण केल्यानंतर वर्षभरात 51 सामाजिक उपक्रम करून एक वेगळा विक्रम केला आहे या वर्षभरात नाही रे वर्गासाठी छोटे-मोठे कार्यक्रम घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम रवी सोनार यांनी केले शैक्षणिक सामाजिक साहित्यिक असा 51 उपक्रमांचा संकल्प त्यांनी सोडला होता आणि पाहता पाहता 56 उपक्रम पूर्ण केले निसर्ग संवर्धनासाठी बीज गोळे वाटप तसेच वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विविध शाळा ग्रंथालय वृद्धाश्रम अनाथाश्रम अशा ठिकाणी पुस्तकं भेट देणे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना दिवाळी किट देणे अशा अनेक उपक्रमांनी त्यांनी आपला संकल्प पूर्ण केल्याबद्दल राणा प्रताप ग्रुप व परिवर्तन ग्रुप यांनी त्यांचा 51 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार केला.
"रवी सोनार यांच्या सहवासात आले की काहीतरी करण्याची ऊर्जा प्राप्त होते आणि कोणताही भावना आणता समाजासाठी काही करता येते याची जाणीव होते", असे उद्गार धनाजी देशमुख यांनी सत्कार सोहळ्यात बोलताना काढले
प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले की, "रवी सोनार सारखी माणसं खूप मोठे काम करत आहेत त्यामुळे त्यांचे कौतुक होणे उचित आहे."
"रवी सोनार यांच्यासारखा स्वच्छंदी आणि साहित्यिक मित्र असणे हे भाग्य असते गेले काही वर्षात रवी यांनी केलेले काम इतके मोठे आहे की त्यांचे यादी वाचताना सुद्धा दमछाक होते साहित्य असो की समाजसेवा रवी अगदी मोकळेपणाने सर्वत्र वावरतो स्वतःही आनंदी राहतो आणि समाजालाही आनंद वाटतो", अशा शब्दात माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी साहित्यिक रवी सोनार यांचे कौतुक केले.
"खरंतर मी काही फार मोठे काम करत नाही आपल्याला जे मिळाले ते या समाजातून मिळाले आहे त्यामुळे त्यातला काही भाग आपण समाजाला परत दिला ही काही मोठी बाब नाही तर ते कर्तव्य आहे मी माझे कर्तव्य करतो परंतु माझ्या मित्रांनी माझा सत्कार केला वाढदिवस साजरा केला असे मित्र नशिबाने मिळतात आणि मला ते मिळाले त्यामुळे मी स्वतःला खूप श्रीमंत समजतो", असे सत्कारमूर्ती रवी वसंत सोनार यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले
याप्रसंगी उपस्थितांपैकी प्रताप चव्हाण व डॉ. मैत्रेयी केसकर यांनी प्रतिनिधिक स्वरूपात रवी सोनार यांचे कार्य चित्र उपस्थितांसमोर विशद केले. तर आलेल्या मान्यवर पाहुणे व उपस्थित मंडळींनीही रवी सोनार यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
मित्रमंडळी स्नेही व नातेवाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या सुंदर सोहळ्याचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर सचिन लादे यांनी केले तर मंदार केसकर यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केले शेवटी प्रताप चव्हाण यांनी पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा