हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर यांच्या हस्ते अनावरण
शिवाजी कंटूरकर
हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या हस्ते आज मौजे भाटेगाव ता.कळमनुरी येथिल माजी सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष कट्टर शिवसैनिक स्वर्गीय भालूसिंगजी राठोड यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी आमदार संतोष बांगर साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच आमदार संतोष बांगर साहेब यांनी स्वर्गीय भालू सिंग राठोड यांना श्रद्धांजली वाहत सरपंच असताना स्वर्गीय भालू सिंग राठोड यांनी पाहिलेले मौजे भाटेगाव नगरीच्या विकासाचे स्वप्न आज तब्बल 50 लाख रुपयांचा निधी देत लवकरच ती सर्व विकासकामे पूर्ण करून स्वर्गीय भालू सिंग जी राठोड यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे आमदार संतोष बांगर साहेब यांनी यावेळी माहीती दिली.
यावेळी या कार्यक्रमास माजी जि. प. उपाध्यक्ष राजेश्वरराव पतंगे, जि. प. सदस्य डी. वाय. घुगे, राजू नागरे, श्रीमती लताबाई भालूसिंग राठोड सरपंच भाटेगाव, रामराव राठोड, रामा राठोड, गोपाळ राठोड, ऍड पंजाब चव्हाण, पंढरी मगर, कय्युम शेख, इंजि. संदीप बांगर, रामराव महाराज भाटेगावकर, विनोद चव्हाण, मनोज चव्हाण, तुकाराम खोकले, पंजाब हाके, बाबुरावजी हाके, नंदूसिंग राठोड, रमेश राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष शिवलाल,डॉ.अजय राठोड कपिल भुरे, संजय बहात्तरे,शिवाजी हाके, खंडेराव हाके,संतोष राजाराम चव्हाण,अवधूत हाके, शंकरराव हाके शंकरराव राठोड, रतन राठोड, सचिन जाधव,ऋषी राठोड पंडित राठोड, साईनाथ,वायकुळे, सुधाकर,हाके व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संखेनेउपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा