शिवाजी गाडे यांच्या पाठीवर आदित्य ठाकरे यांची शाबासकीची थाप
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या कार्यावर महाराष्ट्रातील तरुण वर्ग बेहद खुश होऊन ठाकरे नावासाठी व शिवसेना पक्ष वाढीसाठी जीवाचे रान करणारे तरुणाची मोठी फळी आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन मुदखेड येथील तालुकाप्रमुख शिवाजी गाडे यांनी संघटनात्मक कार्य अहवाल सादर केले आहे.
शिवसेना ठाकरे गट असा एक पक्ष आहे की निष्ठावंत कार्यकर्त्याची कदर केली जाते म्हणून गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना पक्षात असलेले कार्यशील कार्यकर्ते शिवाजी गाडे मुदखेड युवा तालुकाप्रमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन सहा महिन्यात केलेले संघटनात्मक कार्य अहवाल सादर केल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी बेहद्द खुश होऊन शाबासकीची पाठ थोपटून शिवाजी असे पक्ष वाढीचे कार्य चालू ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे असेही ठाकरे यांनी म्हणाले.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा