कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.भा.ब्राह्मण महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे मांजरमकर
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
परशुराम जन्मोत्सवानिमित्त अ. भारतीय ब्राह्मण महासंघ तालुका शाखा नायगाव (बा.)च्या वतीने नरसी बस स्थानकात(थंड) पाणी पोई व झोपडपट्टी मधील अस्थायी कामगारांचा व ग्रामीण रुग्णालय नायगाव व वडजे हॉस्पिटल नायगाव येथे आज जन्म झालेल्या शिशुचा व मातांचा साडी ब्लाउझ दस्ती टोपी व मिठाई देऊन सन्मान करीत सत्कार करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.भा.ब्राह्मण महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे मांजरमकर हे होते.प्रारंभी नरसी येथील झोपडपट्टी वस्तीतील अस्थायी ३७ कामगार यांच्या पत्नीचा सन्मान करण्यात आला व झोपड पट्टी मध्ये जाऊन परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या समवेत मिठाई खाऊन आनंद व्यक्त करण्यात आला.त्या नंतर नरसी येथील बसस्थानक येथे भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून वाहतूक नियंत्रक बैस व पवार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व पान पोईचे उदघाटन करण्यात आले.या वेळी ब्रह्म मित्र, सह ब्रह्मवृंद व प्रवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या नंतर ग्रामीण रुग्णालय नायगाव बा.येथे उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी सोनकांबळे साहेबांचा व वडजे हॉस्पिटल येथे प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डाँ गुलाबराव वडजे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून दोन्ही रुग्णालयातील १४ नवजात बालकांची माता यांचा साडी, दस्ती, टोपी व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.भगवान परशुराम मतृभक्ती चा जागर असल्याने ब्राह्मण समाजातील निराश्रित महिला यांचा वर्षभर सन्मान करण्याची व त्यांना आधार देण्याची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या वेळी आ.भा.ब्राह्मण महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे मांजरमकर,युवाजिल्हाध्यक्ष प्रज्योत कुलकर्णी,ब्रह्म मित्र पुरस्कार प्राप्त जेष्ठ नागरिक भा.ग.मोरे,जेष्ठ सल्लागार श्याम कुलकर्णी ,मंगेश देशपांडे,अभिवक्ता संघाचे ता.अध्यक्ष ऍड.निलेश देशपांडे,ता.कार्यध्यक्ष प्रदीप जोशी नरसिकर,गणेश मेहता अर्जुन मेहता,जितेंद्र मेहता,मोहन मेहता,शंकर मेहता,युवा शहराध्यक्ष सागर पांडे,युवा ता.अध्यक्ष रोहन जोशी ,ता.सचिव ऍड राजेश कुलकर्णी कुंटुरकर,शहराध्यक्ष सुनील देसाई,विद्यार्थी आघाडी शहरअध्यक्ष ऋषिकेश सुधीर जोशी.या सह नायगाव नरसी येथील ब्रह्म वृंद व ब्रह्म मित्र मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा