पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
बिलोली तालुक्यातील मौजे यसगी येथील प्रचंड शिवराज यसगीकर यांच्या शेतातील केसरी आंब्याचे वादळ वाऱ्यामुळे दिनांक 20 एप्रिल रोजी अतोनात नुकसान झाले असल्याने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सदर शेतकऱ्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
अवकाळी पाऊस गारा व तुफान वारा यामुळे विविध ठिकाणी शेतकऱ्याची उभ्या पिकं नष्ट झालेली असून त्यांचे वेळो वेळी पंचनामे व नुकसान भरपाई देणे गरजेचे असल्याने सदर शेतकऱ्यातून चर्चा केली जात आहे. बिलोली तालुक्यातील मौजे यसगी येथील प्रगतिशील शेतकरी प्रचंड शिवराज यशगीकर यांच्या शेतात केसरी आंब्याची लागवड केली होती सदर झाडांना केसरी आंबे ही फळे प्रचंड प्रमाणात लागलेली होती परंतु दिनांक 20 एप्रिल रोजी वादळ वाऱ्यामुळे केसरी आंब्याची फळे सडलेली आहेत व शेकडो किव्टंल खाली पडून त्याचे अतोनात नुकसान झाले असल्याने शासनाने पंचनामा करून आपणास मदत मिळावी अशी मागणी आमच्या प्रतिनिधी जवळ सदर शेतकरी यांनी व्यक्त केली आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा