महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या जनगणना विभागीय प्रमुखपदी व राज्य कार्यकारिणीवर निवड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव शहरातील आर्य वैश्य समाजातील युवा नेतृत्व पवन गादेवार सुजलेगाकर यांची महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या जनगणना विभागीय प्रमुखपदी व राज्य कार्यकारिणीवर नुकतीच निवड करण्यात आली आहे या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई ,कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार, राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार यांच्यासह महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी पवन गादेवार यांनी केलेल्या समाज हिताचे कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या जनगणनेच्या विभागीय प्रमुखपदी निवड केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पवन गादेवार हे आर्य वैश्य समाजातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी सदैव प्रयत्न करीत आहेत महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यसह विदर्भात आर्य वैश्य समाजाची जनगणना करण्याचे कार्य हाती घेतले आहे.
हे कार्य यशस्वी करण्यासाठी राज्यात अनेक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येऊन त्यांना जनगणनेचे कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात पवन गादेवार यांचा समावेश असून महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्यासह महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती आपण सार्थ यशस्वीपणे पार पाडू असे आश्वासन पवन गादेवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिले आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा