उन्हाच्या तडाख्यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
खरबा नजीक रस्ता ओलांडताना एका हरणाचा अज्ञातवाच्या धडकेने मृत्यू झालेला आहे. ही घटना दि. २४ सकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान घडली आहे.
जंगलातील सर्वच ठिकाणच्या नैसर्गिक पाणवठ्याचे केव्हाच बाष्पीभवन झाल्याने जंगलात पाणीच नसल्यामुळे वन्य प्राण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनला आहे. पिण्याच्या पाण्याच्या शोधात वन्य प्राणि गाव वस्तीकडे धाव घेत आहेत.
असाच् एक वन्य प्राणी हरीण ( काळवीट ) हा पाण्याच्या शोधात भटंकती करीत असतांना अज्ञात वाहनाखाली आल्याने त्याचा दुर्दैवी मुर्त्यू झाला आहे. जंगलातील वन्य प्राणी हरीण, काळवीट, रोही, वानर व अन्य प्राणी पाण्याच्या शोधात गाव वस्तीकडे धाव घेत आहेत. अश्यातच वन्य प्राण्याच्या जीवितास धोका पोहचत आहे. वन विभागाकडून कुठल्याही प्रकारची उपाय योजना होत नसल्याने आश्चर्य होत आहे. जवळच पैनगागा अभयारण्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने वन्य प्राणि अभयारण्यातून या भागात पलायन करून येत आहेत. दि. २४ ,रोजी एका वन्य प्राण्याचा जीव गेला आहे. या अगोदरही अनेक वन्य जिवाच्या जिवाला धोका झालेला आहे. हे विसरून चालणार नाही. या बाबींकडे वन विभागासह इसापूर प्रकल्पांतून पैनगंगेत पाणी सोडण्यात यावे. व तसेच वन विभागाकडून वन्य प्राण्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी. अशी मागणी वन्य प्रेमी नागरिकांतून पुढे आली आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा