शेतकरी बसणार पंचायत समिती समोर उपोषणाला
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
शेतीला पाणी देण्याकरता खडकपूर्णा नदीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी नदीपात्रामध्ये व तसेच नदीच्या काठाला विहीर घेतलेली आहे याच प्रमाणे दुसरबिड येथील शेतकरी बाजीराव वाघ यांची विहीर नदीपात्रामध्ये मोठ्या पुलाजवळ असून त्याच शेजारी किनगाव राजा पाणीपुरवठा विहीर सुद्धा आहे या पाणीपुरवठ्याच्या विहिरीमधून गाळ काढण्याकरता किनगाव राजा ग्रामपंचायत ने पोकलॅन्ड या मशीनच्या साह्याने गाळ काढण्यात आला असून शेजारीच बाजीराव वाघ या शेतकऱ्याची विहीर असून रात्रीच्या वेळेस माझ्या विहिरीचे कड्याचे नुकसान झालेले आहे असे एका निवेदनाद्वारे बाजीराव वाघ यांनी गट विकास अधिकारी सिंदखेडराजां यांना कळविले आहे.
याबाबत ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांच्याकडे वेळोवेळी तोंडी तक्रार केली असता तुमच्या विहिरीचे काम करून देतो असे सांगण्यात आले असून परंतु आता मात्र उडवा उडवी चे उत्तर मिळत आहे यामुळे या शेतकऱ्याच्या शेतीला भविष्यात पाणीपुरवठा कशा प्रकारे करायचा असा प्रश्न पडला आहे. यासाठी त्यांनी या निवेदनात असे म्हटले आहे की, "माझे विहिरीची कम पूर्ण करण्यात यावी आठ दिवसात हे काम जर केली नाही तर मी गट विकास अधिकारी सिंदखेड राजा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे" अशी सर्व माहिती शेतकरी बाजीराव वाघ यांनी गट विकास अधिकारी शिनखेडराजा यांना दिनांक 26/ 4/ 2023 रोजी एका निवेदनाद्वारे कळविलेली आहे.
किनगाव राजा ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरी जवळच माझी विहीर/( कडे) असुन माझ्या विहिरीचे पूर्ण पणे नुकसान झाले आहे भरपाई करून नदेल्यास मी आमरण उपोषणाला बसणार आहे
बाजीराव वाघ
शेतकरी
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा