सामाजिक कार्यकर्ते शशिकांत मारोतराव भुसेवाड यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी कोळी महादेव जमातीच्या मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत त्या मागण्या पूर्ण मंजूर होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे समाजाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते शशिकांत मारोतराव भुसेवाड यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण दिनांक 25 एप्रिल पासून चालू राहणार
आदिवासी कोळी महादेव जमातीचे विविध मागण्या संदर्भात दिनांक 25 एप्रिल मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालया पुढे उपोषण साखळी उपोषण चालू असून या उपोषणातील मागण्या नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालयामार्फत कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र शुलभ पद्धतीने देण्यात यावे नांदेड जिल्ह्यातील सर्व विभागीय कार्यातून दिलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करण्यात येऊ नये.
नायगाव बिलोली देगलूर मुखेड तालुक्यात कोळी महादेव जमातीस उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी दिलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करू नये, कारण त्यांनी दिलेले प्रमाणपत्र त्यांच्या कायदेशीर रित्या दिलेले आहेत कोळी महादेव जमातीच्या लोकांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास त्यांना सुद्धा कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र ग्रह पण जमा करून देण्यात यावेत आता सध्या कोळी महादेव जमातीच्या कुटुंबात जात वैधता प्रमाणपत्र आहे.
अशा लोकांना जमातीचे प्रमाणपत्र दिले जाते आहे ते चुकीचे असून कारण त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे ते सुरक्षित नोकरदार आहेत त्यांनाच पुन्हा प्रमाणपत्र दिले जात आहे गोरगरीब शेतमजूर कष्टकरी यांची मुले मुली हे प्रमाणपत्र पासून वंचित आहेत नांदेड जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील लोकांना आदिवासी विकास विभागाकडून सर्व योजनेचा लाभ मिळावा एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालय किनवट मार्फत मिळणाऱ्या नामांकित इंग्लिश स्कूल मध्ये महादेव कोळी जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे .
नांदेड जिल्ह्यातील ज्या उपविभागीय कार्यामार्फत कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र मिळत होते ते जसेच्या तसे तात्काळ देण्यात यावी सर्व उपविभागीय कार्यालय मार्फत नवीन सी फॉरमॅटमध्ये व केंद्रीय परमिट मध्ये तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे या मागण्यासाठी समाज नेते तथा सामाजिक कार्यकर्ते शशिकांत मारुतोराव भुसेवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे साखळी उपोषण चालू आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा