अवकाळी पाऊस गारा याने सर्वत्र थैमान घातले.
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
अवकाळी पाऊस गारा याने सर्वत्र थैमान घातले असून यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले दिसून येत असली तरी कळमनुरी तालुक्यात दिनांक 26 एप्रिल रोजी अवकाळी पाऊसाने प्रचंड शेतकऱ्याचे नुकसान केलेली आहे यात केळी, हळद, आंबे, भाजीपाला व अन्य पिकाची प्रचंड प्रमाणात नासाडी झालेली आहे तेव्हा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट दिली आहे ,यांच्या समावेत तहसीलदार सुरेखा नांदे देखील उपस्थित होत्या.
शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन नुकसान झालेल्या पिकाचा त्यांनी त्वरित पंचनामा केला जाईल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आश्वासनही त्यांनी दिले असून एका शेतकऱ्यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून दिला असून शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भ्रमणध्वनीद्वारे यांच्यासोबत झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबत सविस्तर माहिती सांगितली व मुख्यमंत्री त्या पद्धतीने ती समस्या शेतकऱ्यांची ऐकूनही घेतलेली आहेत आमदार संतोष बांगर यांनी सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई देण्यात येईल अशी आश्वासन दिले आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा