दोन दुचाकी स्वाराची समोरासमोर धडक
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
मेहकर जालना महामार्गावर दुसर बीड गावाच्या पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर साईप्रसाद ढाबा नगर माळ या ठिकाणी काल 26- 4- 2023 रोजी रात्री साडे9.30 मिनिटांनी दुसर बीड ते बिबी रोडवर दोन दुचाकी स्वाराची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात घडला या अपघातामध्ये चंद्रकांत शंकर गुंजाळ रा. दुसरबीड हा मृत झाला असून भारत गुंजाळ दुसर बीड तालुका सिंदखेड राजा व रामा नामदेव गुंजकर बोरखेडी शेवाळे तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा हे दोघे गंभीर जखमी असून जालना येथील कलावती रुग्णालयामध्ये जखमीवर उपचार चालू आहेत.
दिनांक 26 - 4 - 2023 रोजी सायंकाळी ठीक साडेनऊ वाजता चंद्रकांत शंकर गुंजाळ व भरत गुंजाळ हे दोघे दुचाकी क्रमांक एम एच 28 बी सी 20 31 दुचाकीने दुसरबीड कडे येत असताना दुसरबीड कडून बीबी कडे जाणारी दुचाकी क्रमांक एम एच 12R.C.2306 या क्रमांकाच्या गाडीने रामा नामदेव गुंजकर हा बोरखेडी शेवाळे येथे गावी जात असताना दुसरबीड गावाच्या पूर्वेस नगर माळ या ठिकाणी साईप्रसाद हॉटेल जवळ दोघांची समोरासमोर धडक झाली असून मोठा अपघात झाला या अपघातामध्ये चंद्रकांत शंकर गुंजाळ यांचा मृत्यू झाला असून भारत गुंजाळ व रामा नामदेव गुंजकर या दोघांना गंभीर अवस्थेमध्ये पुढील उपचाराकरिता जालना येथील कलावती रुग्णालयामध्ये पुढील उपचार सुरू आहेत वृत्त लिहीपर्यंत किनगाव राजा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल न झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही मृतकाच्या नातेवाईकास संपर्क केला असता आज सर्वत्र दुःख पसरली असल्यामुळे घडलेल्या घटनेची तक्रार देता आली नाही असे सांगण्यात आले या अपघातामध्ये मृत झालेल्या या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या चंद्रकांत शंकर गुंजाळ यांच्या मृत्यूची शोक कळा दुसरबीड गावावर पसरली असून सर्वत्र व्यक्त केली जात आहे
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा