अवकाळी पावसाचा कहर सुरूच त्यात वादळी वाऱ्याची आणि विजा पडण्याची भर
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
सध्या राज्यात अवकाळी पाऊस गारपीट यांनी थैमान घातले असून महाराष्ट्राच्या विविध भागात कधी अवकाळी पावसाचा मारा होतोय तर कधी गारपीट त्यातच भर म्हणून वादळी वारे आणि विजा पडणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात दिनांक 27 एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला पाठोपाठ पावसाला सुरुवात झाली.
आणि गारपीट देखील होऊ लागली घोगरी शिवारातील बालाजी विठ्ठल घारके या शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली बैल बांधले होते विजांचा कडकडाट सुरू असतानाच या ठिकाणी विज पडली आणि त्यामध्ये या दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला . अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला असताना आता हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या जनावरांच्या जीवाचा वैरी झाला आहे.
नुकतीच नगर जिल्ह्यात वीज पडून एका शेतमजूर महिलेचा मृत्यू झाला याची घटना घडली असताना आता नांदेड जिल्ह्यात वीज पडून दोन बैलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने शेतकरयात चिंतेचे वातावरण आहे. तर सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि जनावरांचे झालेले नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ही शेतकरी वर्गातून होत आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा