43 उमेदवारांपैकी 16 उमेदवारांनी दिला जाहीर पाठिंबा 17 विरुद्ध 10 सरळ लढत
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे कुंटुर कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याची चर्चा सध्या कुंटूर परिसरात रंगत आहे. त्यामध्ये बीजेपी ,काँग्रेससह सर्व पक्ष एकत्र विलीनीकरण होऊन अपक्षाची टक्कर घेत असल्याचे चित्र पहात मिळत आहे , एकूण 43 उमेदवार रिंगणात आहेत ,त्यापैकी 10 अपक्ष आहेत. 33 उमेदवार पार्टी प्रमुख पक्षाचे आहेत. त्या पक्षातील 17 उमेदवाराला निवडणूक चिन्ह मिळाले मैदानात उतरले आहेत. . बाकी 16 जणांनी जाहीर पाठिंबा जाहीर केल्याचे परिपत्रक काढून आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहोत असे स्पष्ट करून टाकले , त्यामुळे 17 विरुद्ध 10 अपक्ष सर्वपक्षाविरुद्ध अपक्ष अशी सरळ लढत कुंटुर मध्ये होणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना 1997 मध्ये झाली तेव्हापासून पहिल्यांदा निवडणूक 2009 मध्ये झाली. काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीवर होती त्यानंतर पाच वर्षांनी निवडणूक होणार म्हणून प्रशासक लागले त्यानंतर महाविकास आघाडीने सत्तेतील काही प्रमुख सभापती म्हणून प्रशासकीय सभापती म्हणून निवडले पुन्हा प्रशासक लागले एकूण अंदाजे दहा वर्षाच्या कार्यकाळाच्या नंतर कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली आहे. त्यामुळे सोसायटी संचालक ग्रामपंचायत सदस्य व इतर हमाल मापाडी यांना मतदानाचा अधिकार दहा वर्षाच्या नंतर मिळाल्याने काही जाणकारातून मत व्यक्त होत आहे.
त्यामुळे पुन्हा सत्ता आपल्याच ताब्यात यावी व बिनविरोध व्हावी असे सत्ताधाऱ्यांना वाटत असल्यामुळे त्यांनी हा डावपेच खेळाले असल्याची ग्रामीण भागात चर्चा सुरू आहे . सध्या 43 उमेदवार रिंगणात होते काही उमेदवारांना शेवटच्या दिवशी माघार घेण्यासाठी तांत्रिक आडचण आली असल्याचे पक्षाचे कार्यकर्ते सांगितले.
16 उमेदवारांना त्यांना माघार घेता आली नाही त्यामुळे त्यांनी सोळा उमेदवारांनी त्या सतरा उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला म्हणून सर्व पक्ष एकत्र येऊन 17 उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
अपक्षांना टक्कर देऊ असे गणित तयार झाले . त्यामुळे कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीजेपी काँग्रेस व इतर पक्ष एकत्र येऊन अपक्षाची लढाई करणार असल्याचे चित्र सध्यातरी स्पष्ट आहे. त्यामुळे कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा सत्ता या सर्व पक्षीय सदस्यची येईल का? शेतकरी विकास पॅनल कडे राहील या अपक्षाकडे जाईल हे मात्र सांगता येत नाही कारण सर्व मतदार जागृत आहेत . त्यांना शेतकऱ्यांची कळवळा व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाही व पुढील सोडता येतील का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले असून नवतरुण व अपक्ष उमेदवाराला मतदार तारतील का किंवा पुन्हा सत्ताधाऱ्याकडे सत्ता जाईल का हे चित्र येथे 28 तारखेला मतदान झाल्यानंतर स्पष्ट होईल अशी चर्चाही परिसरामध्ये जोरदार सुरू आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा