जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर कार्यक्रमाचे अध्यक्ष
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव शहरातील डी बी पाटील कॉम्प्लेक्स येथे विविध आजारी रुग्णांच्या उपचारासाठी व त्यांना मेडिकल उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या अध्यक्षतेखाली युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे.
दिवसेंदिवस विविध आजारांना तोंड देण्यासाठी रुग्णांना सामोरे जावे लागते म्हणून नायगाव शहरातील डी बी पाटील कॉम्प्लेक्स येथे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या अध्यक्षतेखाली युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत तिरुपती मेडिकल आणि सर्जिकलचा शुभारंभ आज दिनांक 22 एप्रिल रोजी करण्यात आलेला आहे. प्रारंभी सदर मेडिकलचे उद्घाटन झाल्यानंतर उपस्थित पाहुणे मंडळी व मान्यवरांचे मेडिकलचे प्रमुख भंडारे मामा व अनिकेत पाटील जाधव यांच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे.
यावेळी ज्येष्ठ नागरिक हनुमंतराव पाटील चव्हाण, खरेदी विक्री महासंघाचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण, नायगाव नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य माधवराव बेळगे यासह अँड खुशालराव सुजलेगावकर, निळकंठ पोलीस पाटील, सुधाकर बकवाड, बालाजी उमाटे, भाऊसाहेब चव्हाण, शिवाजी पाटील शेळगावकर, संजय पाटील चव्हाण, माणिक पाटील चव्हाण, दत्ता हरी सालेगावकर, ब्रह्मानंद देसाई, शिवाजी हिमकेकर, माधवराव मुकदम, केशवराव ताटे, आनंद पाटील शिंदे, हनुमंतराव महादवाड, गोविंद पाटील शिंदे, रणजीत पाटील शिंदे, माधव पाटील शिंदे, कैलास पाटील शिंदे, धनराज पाटील पांढरे, शंकर पाटील शिंदे, पांडुरंग पाटील कुदळेकर, विठ्ठल पाटील जाधव, बाबुराव पाटील जाधव, नागोराव पाटील जाधव ,अजय पाटील जाधव यासह अन्य पाहुणे मंडळीची उपस्थिती होती. सर्व उपस्थित पाहुणे व मान्यवरांचे आभार अनिकेत पाटील जाधव यांनी मानले आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा