रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य आदींसाठीआपण निधी मागण्यास कुठे कमी पडू नका - सभापती सोमनाथ आवताडे
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या मतदारसंघात सध्या रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य आदी कामांना भरघोस असा निधी आणून नुसता कामाचा धमाक सुरू केला असून आज २५ एप्रिल रोजी पंढरपूर तालुक्यातील मौजे तपकिरी शेटफळ येथील बाबर वस्ती ते साबळे वस्ती रस्ता व तपकिरी शेटफळ ते संगेवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा पार पडला.
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला यावेळी सभापती महोदय यांनी बोलताना सांगितले की आपण कामे मागण्यास कुठे कमी पडू नका आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना सांगितले
पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार समाधानदादा अवताडे यांनी मतदारसंघात अल्पवधी काळात जनतेच्या गरजा लक्षात घेता पाणी रस्ते वीज आरोग्य शिक्षण आधी कामे करण्याचा सपाटा लावला आहे आज आमदार साहेब यांचे बंधू मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ मालक अवताडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यचा कायापालट करण्याचा मानस उरासी बाळगत पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील देखणा कायापालट करण्यासाठीं आपल्या मतदार संघात अल्प वधी काळातच झेप भरारी घेत आमदार समाधान दादा आवताडे यांनी विकासा कडे वाटचाल सुरू केली
सदर प्रसंगी मा.उपसभापति विजयसिंह दादा देशमुख, सरपंच महादेव मासाळ अविनाश मोरे सर, ग्राम पंचायत सदस्य डॉक्टर शहाजी साबळे, कृष्णदेव मासाळ, दत्ता माने, माजी सरपंच सुधाकर मासाळ, अरुण चौगुले, ग्रामपंचायत सदस्य शंकर कांबळे, उपसरपंच काशिलिंग चौगुले, ग्राम पंचायत सदस्य विठ्ठल महामोरे ग्रामपंचायत सदस्य मोहन चौगुले, ग्रामपंचायत सदस्य महेश सूर्यवंशी, महादेव माने, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, माजी उपसरपंच दत्तात्रय कोळी, युवा नेते कुमार पठारे,श्री.भारत चौगुले, संजू माने, उत्तम पठारे, माजी सरपंच सिद्धेश्वर महानवर, कुमार पठारे,चंद्रकांत बाबर, दगडू बाबर, संतोष बाबर, हनुमंत बाबर, सिद्धेश्वर पठारे, बिरुदेव माने, पितंबर अरे, गोरख माने, अंकुश मासाळ, श्रीकांत साबळे व नागरिक उपस्थित होते
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा