नांदेड रेल्वे स्टेशन वर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नांदेड व हिंगोली जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदी शिवसेना उपनेते श्री आनंदराव जाधव यांची फेर निवड करण्यात आली आहे.नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्यावर टाकण्यात आली आहे.हंगामी काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मोठे यश मिळविण्याच्या दृष्टीने त्यांची निवड महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभा संपर्कप्रमुख म्हणून शिवसेना उपनेते तथा खासदार हेमंत भाऊ पाटील यांची यापूर्वीच निवड करण्यात आली आहे.उभय नेत्याच्या निवडीमुळे नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नांदेड हिंगोली शिवसेनेच्या संपर्कप्रमुख पदी शिवसेना उपनेते आनंदराव जाधव यांची फेर निवड झाल्याबद्दल त्यांचे प्रथमच नांदेड जिल्ह्यात आगमन होताच नांदेड रेल्वे स्टेशन वर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
तसेच शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना आमदार श्री.बालाजीराव कल्याणकर यांच्या वतीने शिवसेना उपनेते तथा नांदेड हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव साहेब यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित आनंदराव बोढारकर जिल्हाप्रमुख उमेश भाऊ मुंडे जिल्हाप्रमुख सचिन भाऊ किसवे उप जिल्हाप्रमुख संतोष पाटील तालुकाप्रमुख उत्तर विक्रम पाटील बामणीकर शिवसेना उपशहर प्रमुख दक्षिण यांच्यासह नांदेड शहरातील व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अगदी उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा