जिल्हाधिकाऱ्यांकडे कोळी महादेव जमात बांधवांची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
कोळी महादेव जमातीच्या प्रमाणपत्राची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात येऊ नये तर सुलभ पद्धतीने जमातीचे प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे कोळी समाज बांधवांनी केली आहे.
आदिवासी कोळी महादेव समाजाच्या अनेक दिवसापासून प्रलंबित जमातीची प्रमाणपत्र मिळावेत म्हणून कोळी बांधवांनी अनेक निवेदने दिली असल्याने ती अडचण समजून घेऊन उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी आपल्या अधिकाराप्रमाणे कायद्यानुसार कोळी महादेव समाजाच्या बऱ्याच लोकांना जमातीचे प्रमाणपत्र देऊन समाजावरचा होणारा अन्याय दूर केला व कोळी महादेव समाजास त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. परंतु काही कोळी समाजातील लोक राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करा असे निवेदने देऊन व सत्याग्रह करून त्यांची बदनामी करत असल्यामुळे नायगाव बिलोली मुखेड देगलूर तालुक्यातील अनेक लोकांच्या संचिका प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.
उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मी तुमचे कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र देत आहे परंतु काही लोक माझी बदनामी करत असल्यामुळे मी सध्या प्रमाणपत्राचे प्रकरण काळजीपूर्वक चौकशी करून योग्य असेल तरच देणार असल्याचे गिरी म्हणाले तेव्हा जिल्हाधिकारी यांनी कोळी महादेव लोकांना दिलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करून योग्य असेल तरच देणार असल्याचे गिरी म्हणाले तेव्हा जिल्हाधिकारी यांनी कोळी महादेव लोकांना दिलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करण्यात येऊ नये सदर प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया चालू ठेवावी तसे उपविभागीय कार्यालयांना आदेशित करावे
अन्यथा दिनांक २५ एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालया पुढे न्यायाच्या भूमिकेने उपोषण करणार असल्याचे निवेदन युवा कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रलाद मद्देवाड यासह नागनाथ लोखंडे, इंद्रजीत तुडमे, लक्ष्मण कंधारकर, अशोक गजलवाड, उत्तम रोडेवाड, माधव ऐंजपवाड, साईनाथ पिल्लेवाड, शंकर तमवाड, सूर्यकांत पोलकमवाड, पवन कुमार पुठेवाड, बाबाराव इंगळे, विठ्ठल शेट्टेवाड, मारुती कांबळे, माधव काळेवार, हनुमंत तमवाड, गोविंद परतवाड, देवराव गडले, दादाराव अलगुलवाड, बालाजी तुरटवाड, बालाजी बोमवाड, हनुमंत बोईनवाड यांनी दिले आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा