शिवसेना तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील बेलकर यांची नाराजी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता उलटून टाकण्यासाठी भाजप व शिंदे गटाने एकत्र येऊन एकमेकास मित्रपक्ष बनवून आपले सरकार स्थापन केले, असे असताना कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्थानिक भाजप नेत्यांनी वेगळा खेळ खेळला असून शिंदे गटाच्या उमेदवारासोबत युती केलीच नसल्याने शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील बेलकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नायगाव आणि कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चालू असून नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 18 उमेदवारांपैकी बारा काँग्रेस पक्षाचे तर सहा भाजपाचे उमेदवार बिनविरोध काढून मोकळे झाले. परंतु कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 18 जागेसाठी एक बिनविरोध काढून भाजपाने 17 ही उमेदवार उभे केले तर काँग्रेसनेही 17 व शिंदे गटाकडून फक्त गंगाधर बडुरे, प्रल्हाद पिंपळे प्रकाश बेलकर या तिघांची उमेदवारी सदर निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे.
परंतु स्थानिक भाजपा नेते राजेश कुंटूरकर यांनी शिंदे गटाच्या तिन्ही उमेदवारांना आपल्या सोबत घेतले नाही, वरिष्ठ पातळीवर युती असताना या निवडणुकीत असा वेगळा डाव का खेळला गेला म्हणून राजेश कुंटूरकर यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख गंगाधर बडुरे आणि नायगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील बेलकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा