स्तंभ पाडणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी - चव्हाण व तमलुरे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव शहरांमध्ये मध्यवस्तीमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा तैवत ठेवून ज्या वीरांनी निजामांना सळो पळो करून सोडले होते, अनेकांनी कित्येक वर्ष तुरुंगवास देखील भोगला, कित्येकांनी आपल्या परिवारापासून अनेक वर्ष दूर काढली, मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा वीर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ स्तंभ नायगाव शहरांमध्ये 27 मे 1960 रोजी उभारले होते. हा स्तंभ 2023 मध्ये नायगाव नगरपंचायत च्या सत्ताधिकाऱ्यांनी व संबंधित प्रशासनानी मस्तीची गुर्मी दाखवत कुठलेही ठोस कारण नसताना कुठलीही परवानगी न घेता दुसरे स्तंभ न उभारता स्वातंत्र सैनिकांचे स्तंभ अमृत महोत्सव या वर्षांमध्ये निस्तनाबूत केले.
त्या विरोधात सर्वसामान्य जनतेत एक रोशाचे वातावरण निर्माण झाले असून नायगाव शहरातील भाजपा तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन शंकरराव पा. चव्हाण, व शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन रामराव पा. तमलुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धाव घेऊन संबंधित दोषी असणाऱ्या वर कठोर कार्यवाही करावी अन्यथा या विविध जनहितार्थ विषयासाठी 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्यात येईल असा इशारा दिला आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा