maharashtra day, workers day, shivshahi news,

मालवाहतुक ट्रकमधून सोलापूरला जाणार गुटखा पकडला

गुटखा पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला 

Catching gutka , criminality, Police Inspector Ranjit Mane, solapur, mangalwedha,shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा प्रतिनिधी राज सारवडे

कर्नाटकातून आलेल्या विविध कंपन्याच्या ३१ लाख ८०० रु गुटख्यासह ४२ लाख ८ रु ऐवज हस्तगत करण्यात आला याप्रकरणी पोलीसांनी चार जनावर गुन्हा दाखल केला गुटक्यावर पोलीसाकडून वारंवार कारवाई होवून देखील गुटक् टीवीयाची तस्करी सुरुच आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निपानी (कर्नाटक राज्य) येथुन मालवाहतुक ट्रकमधून सोलापूरला गुटखा जाणार असल्याची खबर पोलीसांना लागताच पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी सांगोला नाका सापळा लावला असता मालट्रक क्र एम एच १२ एच.डी. ७८७६ मधुन आज पहाटे ३ वा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या पथकाने नाकाबंदी करून सापळा लावला असता सशंयीत चालकाकडे चौकशी केली.

राजु चंद्रकांत व्होनमाने वय ५८ वर्षे रा. साधेपुर ता. दक्षिण सोलापुर जि. सोलापुर असे सांगीतले. सदर माल वाहतुक गाडीत पाठीमागील बाजुस ताडपत्री बांधलेली सोडुन बॅटरीचे उजेडात पाहीले असता पाटीमागील बाजुस पांढरे रंगाची पोती दिसत होती.सदर पोत्यात काय आहे याबाबत चालकास विचारणा केली असता त्याने सांगीतले की, सदर पांढरे रंगाचे पोत्यात पानमसाला गुटखा व सुगंधी तंबाखु आहे.

असे सांगीतल्याने आम्ही सदर ट्रक चालकास घेवुन मंगळवेढा पोलीस ठाणेस आणुन ट्रक मधील पोती बाहेर काढुन पाहिले असता त्यामध्ये हिरा पानमसाला पिवळा १२० रु.ची १२३४२ पाकिटे कि १४ लाख ८१ हजार ४० रु,रॉयल ७१७ सुगंधी ३० रु किंमतीची २०४०० पाकिटे कि.६ लाख १२ हजारहिरा पानमसाला गुलाबी १३० रु किंमतीची ५२०२ पाकिटे कि. ६ लाख ७६ हजार २६० रु,रॉयल ७१७ सुगंधी तंबाखु ६५ रु किंमतीची ५१०० पाकिटे कि.३ लाख ३१ हजार ५०० रु निळा ट्रक नंबर एम एच १२ १ एच.डी. ७८७६ वाहन कि.११ लाख असा ४२ लाख ८०० रु चा ऐवज हस्तगत करण्यात आला.

सदर वाहन चालकाकडे वाहन मालका बाबत चौकशी केली असता वाहन मालक हा सोमनाथ पुजारी रा. मंद्रुप ता. दक्षिण सोलापुर व वाहतुकदार जबीउल्ला सयद उर्फ रोशन यांच्या मार्फत निपाणी,कर्नाटक येथुन करीत असल्याबाबत सांगीतले.वरील वर्णनाचा व किंमतीचा गुटखाजन्य माल व वाहनाचा पंचनामा करून राजु चंद्रकांत व्होनमाने (वय ५८ रा. साधेपुर ता. दक्षिण सोलापुर), सोमनाथ पुजारी (रा.मंद्रुप) ,जबीउल्ला सयद उर्फ रोशन,रफिक उर्फ रसुल मेनन रा.श्रीरामपुर जि. अहमदनगर यांचे विरूध्द मंगळवेढा पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ येलपले हे करीत आहेत.

सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील,यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक रणजीत माने साो, व सपोनि प्रकाश भुजबळ, प्रशिक्षनार्थी पोसई पुरूषोत्तम धापटे सो. पोहेकॉ दयानंद हेबांडे, पोहकों दत्तात्रय यलपले, पोना सुनिल मोरे, पोकों/वैभव घायाळ पोकॉ/ युवराज वाघमारे यांनी केली.दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील एका ग्रामीण भागातून एक गुटखा व्यापारी शहरातील काही टपऱ्यांवर गुटखा आणून देत असल्याचे बोलले जात आहे. या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे.

पोलिसांनी 11,000,00 रुपयांचा ट्रक व 31,00800 रुपये किमतीचा गुटखा असा एकूण 42,00800 असा पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. याची फिर्याद अन्न व औषध प्रशासनचे उमेश भुसे यंानी दिली आहे



----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !