सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करणार - अमोल जाधव
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (प्रतिनिधी विष्णू मुंगसे)
पारनेर तालुक्यातील पळवे गावच्या उपसरपंच पदी श्री. अमोल बाळू जाधव यांची दिनांक 17 सोमवार रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. पारनेर तालुक्यातील पळवे ही अग्रगण्य असलेल्या सूपा एमआयडीसी परिसरातील अतिशय महत्त्वाच्या समजलेल्या जाणाऱ्या गावांपैकी एक आहे. पळवे खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अमोल बाळू जाधव यांची बिनविरोध निवड झाली असून गावच्या विकास कामासाठी सर्वांना बरोबर घेऊनच गावचा विकास केला जाईल अशी माहिती अमोल जाधव यांनी दिली.
पारनेर तालुका सैनिक बँकेचे मा.व्हाईस चेअरमन संजयजी तरटे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव गाडीलकर, अहमदनगर जिल्हा दूध संघाचे मा.संचालक व भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांतराव देशमुख, मा. चेअरमन रामदासजी तरटे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मावळते उपसरपंच संजयजी नवले (सर) यांनी ठरल्याप्रमाणे विश्वास दाखवत सर्वांचा मान राखत आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा देऊन आपला शब्द पाळला व सर्वांची मने जिंकली तसेच ठरल्याप्रमाणे अमोल बाळू जाधव यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झालीअसून उपसरपंच पदावर विराजमान झाले गावच्या असणाऱ्या सर्व योजना प्रभावीपणे राबविल्या जातील आणि सर्व सदस्यांना बरोबर घेऊन गावची विकास कामे केली जातील अशी प्रतिक्रिया नुतन उपसरपंच अमोल जाधव यांनी शिवशाही न्यूज प्रतिनिधीशी बोलताना दिली.
उपसरपंच निवडीच्या दरम्यान गावातील सर्वच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये पळवे खुर्द गावचे मा.सरपंच नानाभाऊ गाडीलकर, हरिभाऊ भंडलकर, दत्तात्रय जगताप, पोपटराव तरटे, बाळासाहेब जाधव, गजाराम तरटे, मा.सरपंच दादाभाऊ जाधव, पोपटराव जाधव, भाऊसाहेब तरटे (मेजर), रामदास तरटे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गाडीलकर, बायजाबाई इरकर, कविताताई गाडीलकर, संगीताताई शेलार, संजय नवले, सामाजिक कार्यकर्ते रामदास इरकर, गणेश बारगळ, प्रदीप गाडीलकर, भाग्येश देशमुख, राजेश देशमुख, बापू देशमुख, अभय गाडीलकर विलास जाधव, भास्कर शेळके, उल्हास जाधव, फक्कड जाधव, नवनाथ पाचारणे, सोसायटीचे संचालक अजय गाडीलकर, बंडु जाधव शब्बीरभाई तांबोळी, नाना साळवे, पत्रकार सुदाम दरेकर तसेच संपूर्ण मित्रपरिवार व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामसेवक के.पी.अवधूत मॅडम यांनी निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा