केडगाव येथे ओम आद्य स्वामी शिवानंद दादाजी दरबाराचा वर्धापन दिन व रथयात्रा सोहळा
शिवशाही वृत्तसेवा , प्रतिनिधी पळवे खुर्द सुदाम दरेकर
होम हवन, भजन सत्संग, ओम आद्य स्वामी शिवानंद दादाजींचे ज्ञानदान व इतर अनेक कार्यक्रमांचे नियोजन : प्रतिनिधी पळवे खुर्द सुदाम दरेकर
रविवार दिनांक 23 रोजी हा कार्यक्रम हजारोंच्या संख्येने दादाजी भक्तांच्या उपस्थितीमध्ये सुरू होणार आहे. हा कार्यक्रम तब्बल 3 दिवस चालू राहणार आहे. या कार्यक्रमांमध्ये आद्य स्वामी शिवानंद दादाजी, व आद्य जगत जननी जगत माता धुनि द्वारिका मैया तसेच परमपूज्य माऊली योगिता मैया यांचा तीन दिवस केडगाव नगरीमध्ये दादाजी व इतर भाविकांसाठी दर्शन सोहळा व सहवास राहणार आहे. या ठिकाणी आलेल्या भक्तांना स्वामींच्या कृपेने तपोवन प्राप्ती होणार आहे. रविवार दिनांक 23 रोजी सकाळी 9 वाजता स्वामीजींचे नगर दरबार मध्ये शुभ आगमन होणार आहे. त्या ठिकाणी त्यांचे स्वागत पूजन भक्तांना दर्शन हा कार्यक्रम होणार आहे.
सकाळी9:30 ते 10 नाश्ता प्रसाद,10 ते11 भजन सत्संग, 11 ते 12 स्वामींचे अनमोल ज्ञानदान, दुपारी 12 ते 1:30 हवन भजन सत्संग, व आद्य विभूतीचे वाटप होणार आहे.1:30 ते 2:30 महाप्रसाद 2:30 ते 4:00 ज्ञानदान वाचन व ज्ञान चर्चा,4:00 ते 5:00 रथयात्रा पूर्व तयारी रथ यात्रा आरंभ स्थळी प्रस्थान 5:00 ते 9:00 वाजता भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.9:00 ते 10:30 स्वामीजींचे स्वागत व स्वामीजींचे अनमोल ज्ञानदान रा.10:30 ते 11:30 महाप्रसाद रा.1130 नंतर श्री तिरळे यांची भजन संध्या हा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि.24 रोजी 9:00 वाजता स्वामीजींचे दरबारात शिवबा आगमन पूजन व भक्तांना दर्शन 9:30 ते 10:00 नाश्ता व सरबत प्रसाद,10ते 11 स्वामीजींचे अनमोल ज्ञानदान,11:00 ते 1:00 हवन व भजन सत्संग,1:00ते 2:00 महाप्रसाद,2:00ते 5:00 सांस्कृतिक कार्यक्रम,5:00ते 5:30 चहा प्रसाद,5:30ते 7:00 ग्रंथ वाचन व ज्ञान चर्चा,7:00ते 8:00 स्वामींचे अनमोल ज्ञानदान,8:00 ते 8:30 स्वामींची महाआरती,8:30 ते 9:30 हवन व दादाजी भक्त श्री.तिरळे यांची भजन संध्या,9:30 ते 10:30 महाप्रसाद 10:30 नंतर भजन सत्संग, मंगळवार दिनांक 25 रोजी सकाळी 9:00 वाजता स्वामीजींचे दरबारात शुभ आगमन पूजन व भक्तांना दर्शन, 9:30 ते 10:00 नाश्ता प्रसाद 10:00 ते 11:00 भजन सत्संग,11:00 ते 12:00 स्वामींचे अनमोल ज्ञानदान, दुपारी 12 :00 ते 1:00 हवन व भजन सत्संग 1:00 ते 2:00 महाप्रसाद,2:00 ते4:00 ज्ञानदान वाचन व ज्ञान चर्चा,4:00 ते 5:00 स्वामींचे अनमोल ज्ञानदान, सायंकाळी 5:00 नंतर चहा प्रसाद .
स्वामींचे पुढील कार्यक्रम साठी वाळकी तालुका नगर कडे प्रस्थान, तसेच या ठिकाणी आकर्षक फुलांनी दरबाराची सजावट केली जाणार आहे. आकर्षक रांगोळी काढण्यात येणार आहे. तसेच लाईट डेकोरेशन व्यवस्था चूक ठेवण्यात येणार आहे. या रथयात्रा सोहळ्यामध्ये महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील हजारोंच्या संख्येने दादाजी फक्त हजर राहून हातामध्ये निशान घेऊन दादाजी नामाचा जयघोष करणार आहेत. तसेच या ठिकाणी नवीन गुरुबंधू भगिनींसाठी स्वामीजींच्या हस्ते अनुग्रहाचा देखील कार्यक्रम होणार आहे. असे अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच या ठिकाणी आलेल्या भक्तांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.अशी माहिती आद्य स्वामी शिवानंद दादाजी दरबार केडगाव चे श्री.खेडकर सर, मा.न.सेवक शिवाजीराव लोंढे, श्री जगन्नाथ जाधव, श्री. मेहेर काका, श्री. बाळासाहेब मुळे, श्री भास्कर कापरे, श्री. सुभाष लोंढे यांच्याकडून देण्यात आली आहे. व या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा