शासनाचा महसूल बुडीत
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे धनंज येथील नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक झोक्याच्या साह्याने काढत असून रात्रंदिवस बिनधास्तपणे रेती चोरी केली जात आहे. याकडे तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचे दुर्लक्ष होत असताना गावातील एका नागरिकांनी तशिलदारांना फोन करून सांगितले दिवस रात्र रितेची चोरी होत असताना आपण बघत आहात तहसीलदार यांनी लगेच फोन तलाठ्याला करून तलाठ्यांना जाण्यास सांगितले मात्र तलाठ्याने परस्पर फोन लावून रेती वाहतूक बंद करा असे सांगल्याने तीन दिवसात पासून जोरदार रेती वाहतूक केली जात होती.
सध्या रेती वाहतुकीवर नियंत्रण नाही. त्यामुळे बिनधास्तपणे रेतीची चोरी करून आपले उकळ पांढरे करणाऱ्या काही गावातील प्रमुख व्यक्तींना शासनाने दंड लावण्यात यावा व महसूल बुडत असल्याने त्यांच्याकडून महसूल वसूल करण्यात यावा अशी परिसरातून मागणी होत आहे . धनंज हे गाव नदी जवळचे गाव असून सध्या परिसरातून दुर्लक्षित गाव असताना तहसील व मंडळ अधिकारी व तलाठी पोहोचू शकत नाहीत . त्यामुळे नागरिकाचा फायदा घेऊन रात्रंदिवस रेतीची चोरी करत आहेत. त्याचबरोबर मुरुमही गायरानातून चोरी करून , रस्ते बनवले आहे. सदर रेती व अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांना दंड वसूल करण्यात यावा व महसूल वसूल करण्यात यावा अशी मागणी नागरिकात होत आहे. News
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा