वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या त्या पोलीसांविरुद्ध कार्यवाहीची मागणी
शिवशाही न्यूज, जिल्हा प्रतिनिधी मिलिंदकुमार लांडगे छत्रपती संभाजी नगर फुलंब्री
तुझ्या नवर्याला सांभाळ म्हणत पत्रकार पत्नीला धमकावले मराठवाडयाच्या छत्रपती सभाजी नगर जिल्ह्यातील वडोद बाजार ता फुलंब्री येथील पोलीस ठाणे हद्दीत बोकाळलेल्या अवैध धंद्या बाबत बातमी छापली म्हणून पत्रकाराला घरी जाऊन धमकावणाऱ्या व आत्महत्या करणाऱ्या परावृत करणार्या पोलीस ठाणे वडोद बाजार च्या त्या पोलिसांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघातर्फे करण्यात आली आहे.
फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत अनेक ठिकाणी अवैध देशी दारू विक्री , अवैध पत्त्याचे कल्ब , ऑनलाईन सट्टा - मटका यासह अवैध वाळू वाहतूक , अवैध वृक्षतोड , अवैध गोमास वाहतुक , जोरात सुरु असून वडोद पोलीस ठाण्यात नव्याने आलेले स पो नि विलास मोरे हे धंदे रोखण्यात अपयशी ठरले असून आर्थिक संबंधातून वडोद बाजार पोलिसांकडून अवैध धंदे चालकांना अभय दिले असून याबाबत समस्त नागरिक त्रस्त असल्याने अनेकांनी वारंवार तक्रारी करूनही फायदा होत नसल्याने परिसरातील दैनिकाच्या प्रतिनिधींनी दैनिकात बातम्या प्रकाशित केल्याने वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या संदर्भात बातमी छापल्याने वडोद पोलिसांची पित्त खवळले व अवैध वाळु वाहतूकदार आणि ठाण्याचे पोलीस कर्मचारी रवी देशमुख व स पो नि विलास मोरे यांची तात्काळ इतरत्र बदली करण्यात यावी व पोलीसां सोबत घरी आलेले खाजगी व्यक्तीं व वाळू तस्करावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे . अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघातर्फे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलीस अधिक्षकाकडे करण्यात आली आहे . अन्यथा सरनावर बसून पोलीस ठाण्या समोर उपोषण व आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा