आपक्ष उमेदवारांमुळे बिनविरोध कार्यक्रम रखडला
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक चांगला जोर धरत असून कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होते की नाही या चर्चेची वेगळीच वळण लागले असून शेवटच्या दिवशी 43 उमेदवारी अर्ज राहिले असून आज 21 तारखेला चिन्ह वाटप झाले. 43 जणांनी चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत . मात्र राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी व शिंदे गट एकत्र मिळून अपक्षाशी लढणार असल्याचेही गावातील चर्चेला उद्यान आले आहे.
माघार घेण्यासाठी आलेल्या काही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उशीर झाल्यामुळे रात्री साडेनऊ वाजेपर्यंत माघार घेण्यासाठी अनेक मोठमोठ्या दिग्विजानी फोनवरून संभाषण व एकमेकांच्या गाठीभेटी घेतल्या मात्र मागे घेण्याचा कार्यक्रमाला उशीर झाला असल्यामुळे 43 जण रिंगणात असूनही एकमेकाला पाठिंबा देऊन सर्व पक्षांनी एकत्र मिळून 17 उमेदवार निवडून आणले जातील अशी तयारी दाखवत असून अपक्ष्याच्या सात उमेदवाराशी हे उमेदवार टक्कर घेऊन निवडणूक लढवली जाईल अशी चर्चा ग्रामीण भागात सध्या जोर धरत आहे .
बिनविरोध साठी राजकीय पुढारी या कामी लागले होते मात्र बिनविरोध काय होऊ शकले नाही. त्यामुळे 43 उमेदवार रिंगणात असूनही आपापल्या पक्षाचे उमेदवाराने जागा वाटून तेवढेच उमेदवार रिंगणात अपक्षांची टक्कर घेऊन निवडून आणून आपलाच विजय मिळवू आसी चर्चा सध्या कुंटुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा