शिवसेना युवा तालुका प्रमुख शिवाजी ईबितदार यांची निवेदनातुन मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील गोदमगाव येथे गेल्या तिन महिन्यापासून गावातील विद्युत पुरवठा बंद आसल्यामुळे गोदमगाव येथील गावातील लोंकाना तिन महिन्यापासून अंधारात राहावे लागत आहे.त्यामुळे गावातील नागरीकांना जिवन अंधारमय जगावे लागत आहे.
तसेच गावातील विद्युत पुरवठा तिन महिन्यापासून बंद असल्यामुळे गावकऱ्यांना विविध अडचणी येत आहेत,व गोदमगाव येथील नागरिकांना दळन दळण्यासाठी आंचोली,कोलंबी,मांजरम ह्या गावातुन डोक्यावर दळन घेऊन जावून दळुन आनावे लागत आहे त्यामुळे गावातील नागरीकांना सतत तिन महिन्यापासून त्रास सोसावा लागत आहे.व शैक्षणिक विद्यार्थ्यांना लाईट नसल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर गंभीर परीणाम होत आहेत.व याच गावातील जि.प.प्राथमिक शाळेतील लाईट दोन वर्षां पासुन नसल्यामुळे गावातील शैक्षणिक कार्य देखील अंधारमय झालेले असल्यामुळे
गावातील ग्रामपंचायत कार्यालया चे पदाधिकाऱी व गावातील ग्रामस्थ यांनी नायगाव येथील महावितरण विद्युत शाखा अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून गावातील विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत चालू करून करा अशी विंनती करून ही अद्याप विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आलेला नसल्यामुळे
युवा शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी ईबितदार यांनी दि.16 मार्च 2023 रोजी मा. उपविभागीय कार्यकारी अभियंता महावितरण विद्युत मंडळ देगलुर ता.देगलूर जिल्ह्य नांदेड यांना निवेदन देऊन लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत चालु करण्यात यावे. अन्यथा सदरील गावातील ग्रामस्थांना घेऊन युवा शिव सेनेच्या वतिने आपल्याच कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा युवा शिव सेना नायगाव तालुकाप्रमुख शिवाजी ईबीतदार,मांजरम सर्कल प्रमुख मारोती भागानगरे,शाम पाटील शिंदे, बाळु पाटील वडजे,गिरी परमेश्वर बाबागुरू यांनी निवेदनातुन दिला आसल्याचे आमच्या दैनिक वैराग्यमूर्ती चे नायगाव तालुकाप्रतिनिधी नागोराव पाटील बंडे यांच्याशी बोलताना माहिती दिली.
-------------------
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा