महाराष्ट्र राज्य तलाठी संघ नायगाव चे तलाठी बेमुदत संपात सहभागी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
महाराष्ट्र राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतिने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संप सुरू आसलेल्या संपात महाराष्ट्र राज्य तलाठी संघ नायगाव चे तलाठी संपात सहभागी होत आसल्याचे निवेदन दि.11 मार्च 2023 रोजी मा.तहसीलदार नायगाव यांना निवेदन देऊन दि.14 मार्च 2023 पासुन सुरू आसलेल्या बेमुदत संपात सहभागी होत आसल्याचे निवेदन देऊन संपात सहभागी झाले आहेत.
या चालु आसलेल्या बेमुदत संपातील या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या, महाराष्ट्र शासनाने माहे नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रूजु झालेल्या सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे.परिणामी संबधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात उद्भभवणाऱ्या आरोग्य विषयक तसेच विविध समस्यांना तोंड देण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आपत्ती येवु शकते ,किंबहुना 2005 नंतर सेवेत लागलेल्या ज्या कर्मचाऱ्यांचे निधन झाले त्यांच्या कुटुंबांना अंत्यत नाममात्र रक्कम मिळाली असुन त्या कुंटूबापुढे मोठे आर्थिक पेचप्रसंग निर्माण झालेल्या अश्या अनेक घटना आपल्या राज्यात घडलेल्या आहेत.
त्यासाठी जुनी पेन्शन योजना राज्यात लागु करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून विविध स्तरावरून निवेदने ,मोर्चा, आंदोलने करूनही राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न करता आजपर्यंत कोणत्याही स्वरूपाची ठोस भूमिका घेतली नाही.त्या निषेधार्थ राज्य सरकारी संघटनेने दि. .14 मार्च 2023 पासुन बेमुदत संप पुकारलेला आहे.महाराष्ट्र राज्य तलाठी संघ हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेशी संलग्न असुन महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे बहुतांश सभासद हे 2005 नंतर सेवेत आलेले आसल्यामुळे व कोणत्याही परिस्थितीत नविन कर्मचाऱ्यांसाठी राज्यात जुनी पेन्शन योजना लागु झालीच पाहिजे हि राज्य तलाठी संघाची ठाम भूमिका आहे.
त्यामुळे राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने दि.14 मार्च 2023 पासुन पुकारलेल्या बेमुदत संपात महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे सर्व तलाठी,मंडळअधिकारी , सभासद सहभागी होत आहेत,महाराष्ट्र राज्य तलाठी संघ तालुका शाखा नायगाव (खै.) हि संघटना महाराष्ट्र राज्य तलाठी संप यांच्या आदेशानुसार दि. 14 मार्च 2023 पासुन बेमुदत संपात सहभागी होत आसल्याचे माहितीसत्तव निवेदन देऊन बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.
-------------------
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा