महसूल मंत्री यांनी घेतली हदगाव हिमायतनगर तालुक्याची बैठक
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष च्या जालनात हदगाव हिमायतनगर तालुक्यातील विविध विभागाच्या खाते प्रमुखांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत हदगाव हिमायतनगर तालुक्यातील विविध विकास कामे व प्रश्नाच्या संदर्भात आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना व आदेश महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
हदगाव हिमायतनगर तालुक्यातील पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरण्यात यावी, तलाठी कार्यालय, मंडळअधिकारी कार्यालय, तामसा येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करणे, उमरी जहागीर येथे पशुसंवर्धन श्रेणी एक दवाखाना व इतर अनेक विभागातील विषयावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली या बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापुरकर, माजी आमदार अमरनाथ राजुरकर, अतिरिक्त मुख्य सचिव महसूल डॉ. नितीन करीर, सहसचिव इंगळे, पद्मश्री विठ्ठल विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर, जिल्हाध्यक्ष दत्ता जाधव, पांडुरंग बोरकर अपर जिल्हाधिकारी, ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी हदगाव, जीवराज डापकर तहसीलदार
हदगाव, धोंडीबा गायकवाड तहसीलदार हिमायतनगर, राजकुमार रणवीर तालुका कृषी अधिकारी हदगाव, विनायक ढवळे कार्यकारी अभियंता हदगाव, आडेराघू गटविकास अधिकारी हदगाव, मयूर अंदेलवाड गट विकास अधिकारी हिमायतनगर, दिलीप जाधव कृषी अधिकारी हिमायतनगर, राजीव टारफेवाड पशुधन विकास अधिकारी हदगाव, भिसे उपकार्यकारी अभियंता हदगाव, नागेश लोने उपकार्यकारी अभियंता, उमेश सोनटक्के पशुधन विकास अधिकारी हिमायतनगर, यांच्यासह हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. मात्र हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रतिनिधी मात्र या बैठकीस अनुपस्थित होते. या बैठकीला लोकप्रतिनिधी का उपस्थित नाहीत असा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. हदगाव हिमायतनगर चे प्रश्न या बैठकीत कोण मांडणार असेही सुज्ञान नागरिकांतून बोलल्या जात आहे..
-------------------
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा